LizLaz on Virat Kohli: जर्मन मॉडेल लिझलाजच्या फोटोला लाईक केल्यामुळे किंग विराट कोहली चांगलाच चर्चेत आला आहे. आता लिझलाजने या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, तिला याबद्दल बातम्यांमधून समजलं आहे. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना लिझलाज म्हणाली, "मी सकाळी उठले आणि माझ्या लक्षात आले की मी बातम्यांमध्ये आहे. त्याने (विराटने) फोटो कधी लाईक केला हे मला माहीत नव्हते. लोकांनी मला विविध माध्यमांवरून बातम्या पाठवल्या. मला खूप संदेश आले आणि लोक खूप उत्साही होते."
तिने स्पष्ट केले की, तिच्या पहिल्या भारत दौऱ्यादरम्यान ती क्रिकेटबद्दल शिकली आणि तिथे अनेक महिने राहिली. या काळात तिने दक्षिण भारत, गोवा, म्हैसूर, कुर्ग, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद यासह अनेक ठिकाणी भेट दिली. लिझलाजने सांगितले की, आयपीएल दरम्यान ती बंगळूरमध्ये तिच्या मित्रांसोबत सामने पाहू लागली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) ची चाहती बनली. याच काळात तिने विराट कोहलीला खेळताना पाहिले आणि तो तिला आवडू लागला. नंतर, जेव्हा विराटने तो फोटो डिसलाइक केला, तेव्हा लिजलाज म्हणाली, "मला त्याच्यासाठी थोडं वाईट वाटलं. त्याने तो फोटो लाईक केल्याचा मला आनंद झाला, पण हा एवढा मोठा मुद्दा कसा झाला हे मला समजत नाही. कदाचित त्याचा तसा हेतू नसेल, पण तरीही मी त्याच्या पाठिंब्याची प्रशंसा करते."
View this post on Instagram
लिजलाजने दावा केला आहे की, त्या घटनेनंतर तिला कामाच्या अनेक ऑफर्स आल्या आहेत, पण तिला काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. ती म्हणाली की ती संगीत आणि व्लॉगिंगबद्दल गंभीर आहे आणि संधी मिळाल्यास भारतात परतण्याचा विचार करू शकते.
लिजलाजचा फोटो काढणारे फोटोग्राफर, अद्वैत वैद्य यांनी स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, ज्यात त्यांनी दावा केला आहे की विराटच्या अधिकृत अकाऊंटने लिजलाजचा एक जुना फोटो लाईक केला आहे. अद्वैतने कॅप्शनमध्ये लिहिले, "यावर काय प्रतिक्रिया द्यावी... जेव्हा GOAT, विराट कोहली, तुमची पोस्ट लाईक करतो." हे खरंच घडतंय का हे पाहण्यासाठी लिजलाज आणि मी अजूनही डोळे चोळत आहोत... हाहा... धन्यवाद GOAT.
View this post on Instagram
लिझालाज ही एक जर्मन-दक्षिण आफ्रिकन मॉडेल, व्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर आहे, जी भारतात तिच्या ट्रॅव्हल कंटेंटसाठी (जसे की "समोसा समोसा" व्हिडिओ) ओळखली जाते. फिल्मी मंत्राला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की विराट कोहली तिचा आवडता क्रिकेटपटू आहे. कोहलीच्या लाईकचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेक युझर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. तथापि, कोहलीने खरोखरच लाईक केले होते की ही अल्गोरिदममधील त्रुटी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मे 2025 मध्ये, विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो लाईक केला होता. कोहलीने स्पष्ट केले, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा फीड क्लिअर करताना, अल्गोरिदमने चुकून एक इंटरॅक्शन नोंदवली आहे. तसे करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया अनावश्यक कमेंट्स करणे टाळा. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद."
इतर महत्वाच्या बातम्या