कॅफे चालकासोबत प्रतितास 400 रुपयांची डील, सेप्रेट कम्पार्टमेंटमध्ये तरुणींसोबत नको 'ते' कृत्य, अमरावती प्रकरणातील मास्टरमाईंडचा धक्कादायक कारनामा उघड
प्रणय निर्बाण, एबीपी माझा April 18, 2026 01:43 PM

Amravati Crime News: अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण (Amravati Crime News)आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाच्या तपासात दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्याचा कारनाम्याची संतापजनक (Crime News)माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच आता आरोपी अयान अहमद अमरावती शहरातील ज्या कठोरा नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक (Amravati News)शोषण करत होता, त्याच कठोरता भागात असलेल्या 'द कॅफे रॉयल 10' कॅफेमध्ये देखील मुलींना आणायचा, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान कॅफे चालकाला चारशे रुपये प्रतितास द्यायचा. सोबतच या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.

Amravati Crime News: आयानला पोलिसांनी कॅफेआणलं; कॅफेवर अमरावती पोलिसांनी तीन ते चार वेळा रेड

विशेष म्हणजे या 'द कॅफे रॉयल 10' कॅफेवर अमरावती पोलिसांनी तीन ते चार वेळा रेड केलेली आहे. अशातच आरोपी अयान हा अमरावतीसह अचलपूर, परतवाडा मधील कॅफेमध्ये देखील मुलींना घेऊन जायचा. त्या कंपार्टमेंटमध्ये मुला-मुलींचे अश्लील चाळे चालत असल्याचेही समजते. दरम्यान, आरोपी आयानला पोलिसांनी या ठिकाणी चौकशीसाठी आणलं होतं. काल (शुक्रवारी) पोलिसांनी या कॅफे चालकाची चौकशी केली असून कॅफेचा पंचनामा देखील केला आहे. त्यामुळे या कॅफेवर आता पुन्हा मोठी कारवाई केली जाते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chandrashekhar Bawankule: पालकमंत्री म्हणून मी रोज या घटनेला बघत आहे

अमरावतीला प्रत्यक्ष जाऊन घटनेचा आरोपीबाबत काय तपास झाला, हे पालकमंत्री म्हणून मी रोज या घटनेला बघत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता ऍडव्हान्स प्रणाली वापरून, फॉरेन्सिक आणि डिजिटल प्रणालीचा वापर करून तपास सुरु आहे. चौकशी भरकटेल असे कुठलेही वक्तव्य कोणी करू नये. डिजिटल पुरावे त्याच्यात ऑडिट केला जाणार आहे. सात मोबाईल जप्त केले आहे. यात फॉरेनसी तपास झाल्याशिवाय, त्याचा पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही. पोलिसांच्या तपासात नेमकं काय येतं, हे पाहणं जास्त महत्त्वाचा आहे. अंशी प्रतिक्रिया अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.