Latest Marathi News Live Update: आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेववर १० तासांचा विशेष ब्लॉक
esakal April 18, 2026 02:45 PM
Mumbai Live: आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेववर १० तासांचा विशेष ब्लॉक

आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेववर १० तासांचा विषेश मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्रीपासून १० तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी (१९ एप्रिल) रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असल्याने मध्य मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत होणार आहे.

Mumbali Live: नेस्को ड्रॅग्स प्रकरणात आणखी एक आरोपी ताब्यात

नेस्को ड्रॅग्स प्रकरणात आणखी एक फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याने विनीत गेरेलानीच्या UPI वर पैसे ट्रान्सफर केल्याचा संशय आहे.

Pune Live: पुणे विमानतळावर अपघातामुळे अनेक विमान रद्द

पुणे विमानतळावर अपघातामुळे अनेक विमान रद्द

इंडिगोची येणारी 31आणि जाणारी 34 अशी एकूण 35 विमान रद्द

एयर इंडियाची 6 विमान रद्द

Kokan Live: कोकण किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

कोकण किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

तापमान वाढीसोबतच हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा देखील इशारा

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

तापमानाचा पारा 41 अंशांवर

कधीही अवकाळी पाऊस बरसेल अशी परिस्थिती

अरबी समुद्रावर काय ढगांची दाटीवाटी

पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी वर अशीच परिस्थिती राहण्याचा इशारा

ढगाळ वातावरणाचा परिणाम आंब्यावरती होण्याची शक्यता

Pune Live : पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चारचाकी वाहनाला आग लागली

पुण्यात वारजे माळवाडी येथील पूलावर चालू वाहनाला आग लागली

आगीत चार चाकी मालवाहतूक टेम्पो जळून खाक

आगीचे कारण अस्पष्ट

सरकारकडून अचानक स्टेनोग्राफर पदांसाठीची भरती रद्द

स्टेनोग्राफर पद ही मृत घोषित करू नये. गेली पाच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. अचानक असे केल्यास खूप विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. स्टेनोग्राफर मृत घोषित न करता पद भरती करण्यात यावी ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाच्या भरती रद्दच्या शासनाच्या निर्णयाचा पुण्यात विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला. शासनाने निर्णय रद्द करावा या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Chandrashekhar Bawankule : गौण खनिज साठ्यांचे ‘ईटीएस’द्वारे सर्वेक्षण होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मिरज : ‘‘राज्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरी रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, गौण खनिज साठ्यांचे दर तीन महिन्यांनी ‘ईटीएस’ प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे,’’ अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मिरज येथे आयोजित महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन व पुरस्कार वितरण समारंभानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Nashik News : महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज महत्त्वाची बैठक

- महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये आज मोठी बैठक

- आयटी कंपन्या, प्रशासन, लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक

- खरात, एरंडे, TCS प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

- IT कंपन्यांसह सर्वच ठिकाणी विशाखा समिती तसंच पॉश कायद्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार

- ई-बॉक्स पोर्टलद्वारे तक्रार प्रक्रिया सुलभ करणार, महिलांच्या सुरक्षेसाठी ॲक्शन प्लॅन ठरवला जाणार

- महिला सुरक्षेसाठी झिरो टॉलरन्स धोरण देखील लागू करणार

Conversion Controversy at TCS, Nashik : नाशिक TCS कंपनीतील धर्मांतरण प्रकरण : निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता

- नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

- फरार आरोपी निदा खानच्या शोधासाठी SIT ची ३ पथकं मागावर

- मात्र निदा खान अद्यापही फरार, निदाचा मोबाईल बंद असल्यानं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना अडचणी

- तर निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता

- आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून देखील नाशिकमध्ये येऊन प्रकरणाच्या चौकशीची शक्यता

Malvan Accident : डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू; डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू

मालवण : दुचाकीने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरखाली गेल्याने चौके नांदरुख येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०) असे मृताचे नाव आहे. मालवणहून चौकेच्या दिशेने जाताना चौके धनगराचा गोठा येथे अपघात झाला. चौके नांदरुख परिसरात राहणारा चव्हाण नेहमीप्रमाणे दुचाकी (एमएच ०७ एडी- १६३३) कामावरून घराच्या दिशेने येत होता. त्यांच्या सोबत मेव्हणे होते. अगदी घराच्या काही अंतरावर असलेल्या मालवण-कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे डंपरला (एम एच ०७- एक्स- ०६६६) ओव्हरटेक करत असताना अपघात झाला आणि ते डंपरखाली गेल्याने जागेवरच मृत्यू झाला. सोबत असलेल्या मेव्हण्याला किरकोळ दुखापत झाली.

Kopargaon Accident : खरातच्या सहकाऱ्याचा अपघाती मृत्यू; जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी ठार, कोपरगाव तालुक्यातील घटना

शिर्डी (जि. अहिल्यानगर) : समृद्धी महामार्गावर आज (ता. १७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात उद्योजक जितेंद्र शेळके (वय ५६) व त्यांच्या पत्नी अनुराधा (५४) जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा सूचित (१४) जखमी झाला. अपघातात ठार झालेले शेळके हे भोंदू अशोक खरात याच्या शिवनीका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात त्यांची मोटार उभ्या कंटेनरवर जाऊन आदळली. यात शेळके पती-पत्नीचा मृत्यू झाला. खरातप्रकरणी तपास यंत्रणेने त्यांच्याकडे चौकशी केली होती. त्यामुळे त्यांच्या अपघातानंतर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली होती.अपघातात जितेंद्र शेळके जागीच ठार झाले. मात्र, त्यांच्या पत्नी अनुराधा मदतीसाठी ओरडत होत्या.

Sangli News : आईच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

कुपवाड : पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित जगदीश ऊर्फ पवन जीवन झेंडे (वय २८, झेंडे मळा, मानमोडी, ता. मिरज) याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी दिली. मृत संगीता जीवन झेंडे या पती व मुलासह मानमोडी (ता. मिरज) येथील झेंडे मळ्यात राहत होत्या. बुधवारी (ता. १५) सायंकाळी जीवन झेंडे रात्रपाळीला कामावर गेले होते. संगीता व त्यांचा मुलगा जगदीश दोघेच घरात होते. जगदीश याची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्यावरून या दोघांत भांडण झाले. यावेळी रागातून संशयित जगदीशने घरात कोणी नसल्याचे पाहून संगीताचे तोंड, नाक, गळा दाबून तिचा खून केला. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे जीवन रात्रपाळीच्या कामावरून घरी आले असता, हा खून उघडकीस आला. संशयित जगदीश झेंडे याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.

Nuclear Energy : अणुऊर्जेची क्षमता दहा पटींनी वाढविणार

नवी दिल्ली : भारताची अणुऊर्जेची क्षमता सध्या ८.८ गिगावॉट असून, ती २०४७ पर्यंत दहा पटींनी वाढवून १०० गिगावॉटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वीज प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद यांनी केले. दिल्लीमध्ये ‘भारताचा १०० गिगावॉट अणुऊर्जेचा आराखडा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमानंतर प्रसाद बोलत होते. ते म्हणाले, ‘आपण २०४७ पर्यंत अणुउर्जेतून १०० गिगावॉटपर्यंत कशी वीजनिर्मिती करू, याविषयी एक अहवाल तयार करण्यात आला आहे. आता आपली क्षमता ८.८ गिगावॉटची आहे.

Women's Reservation Bill : घटनादुरुस्तीवर सरकार तोंडघशी; महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक दोन-तृतीयांश मतांअभावी फेटाळले

Latest Marathi Live Updates 18 April 2026 : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठीचे महत्त्वाकांक्षी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आज फेटाळले गेले. घटनादुरुस्तीसाठी दोन-तृतीयांश मतांची बेगमी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. विधेयकाच्या मंजुरीसाठी ३५२ मतांची गरज असताना विधेयकाच्या बाजूने २९८ तर विधेयकाच्या विरोधात २३० मते पडली. सरकारचा हा गेल्या १२ वर्षांतील लोकसभेतील पहिलाच नामुष्कीवजा पराभव आहे. या पराभवानंतर आता देशभरात आंदोलन करण्याची घोषणा सत्ताधारी भाजपने केली आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.