Bharat Ganeshpure Reaction On Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे उघड होत आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील जनतेने संताप व्यक्त केला. मुख्य म्हणजे या भयंकर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचंही नाव गोवण्यात आलं. रुपाली चाकणकर अशोक खरातला गुरू मानत होते, ही धक्कादायक बाब समोर आली. दोघांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ समोर येताच, त्यांना आपलं पद गमवावं लागलं. त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. मुख्य म्हणजे फक्त चाकणकर नसून, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचंही नाव या प्रकरणात जोडलं गेलं. केवळ महिलांचं शोषण नसून, अशोक खरात प्रकरणातील अनेक खुलासे उघड होत आहे. हे प्रकरण समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अशातच या प्रकरणावरुन केवळ राजकीय वर्तुळातून नसून, सिनेसृष्टीतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. अलिकडेच मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपी माझाशी संवाद साधताना भारत गणेशपुरे यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, 'अशोक खरातचं स्टेटमेंट आहे, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये.. त्यानं हे स्वत: सांगितलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानं म्हटलं होतं की, चमत्कार वगैरे असं काही नाही. मी थोडा विज्ञानाचा वापर करतो. मी काही ट्रीक वापरतो. याचा वापर करुन मी या गोष्टी केल्या आहेत, असं अशोक म्हणाला होता. आता तरी लोकांनी या गोष्टी समजून घ्यायला हवं की, या गोष्टींमध्ये कोणतीही जादू नाही. कोणताही चमत्कार नाहीये', असं भारत गणेशपुरे म्हणाले. अशोक खरात प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापलं आहे. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनी अशोक खरातवर टीकेचा भडिमार केला आहे. या प्रकरणात आता आणखी किती खुलासे होतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
भारत गणेशपुरे आणि पुजा सावंत यांचा 'सालबर्डी' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 17 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे. या मराठी सिनेमात पूजा सावंतने मनोरमा प्रधान या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पूजा सावंत, भारत गणेशपुरे, शशांक शेंडे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, चित्तरंजन गिरी, कमलाकर सातपुते, ओंकार भोजने आणि अनिल नगरकर यांच्या भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: