बॉलिवूडची झगमगती दुनिया ही अनेकांसाठी आकर्षण असते. या चंदेरी दुनियेत काम करायचं म्हणून दुरून लोक डोळ्यात स्वप्न घेऊन येतात. मात्र या दुनियेचा एक अलिखित नियम आहे. जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना दिसताय तोपर्यंतच तुम्ही चर्चेत असता. इथे दिसण्यासाठी काहीना काही करत राहावं लागतं. एकदा तुम्ही पडद्याआड गेलात की सगळ्यांच्या विस्मरणात जाता. अशी अनेक उदाहरण आजवर प्रेक्षकांनी पहिलीयेत. असंच काहीतरी घडलंय एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत. या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नुकताच ९० चं दशक गाजवणारा लोकप्रिय अभिनेता वर्सोवा जेट्टीवर दिसला. या अभिनेत्याला सुरुवातीला कुणीही ओळखलं नाही. हा अभिनेता आहे राहुल रॉय. 'आशिकी' मधून घराघरात पोहोचलेला राहुल आज चंदेरी दुनियेपासून लांब आहे. राहुल नुकताच वर्सोवा जेट्टीच्या इथे दिसला. सध्या वर्सोवा जेट्टीचं काम सुरू असल्याने राहुल एका सर्वसामान्य माणसाप्रमाणे स्वतःची बॅग उचलून चालत जाताना दिसला. कलाकार म्हटलं की त्यांच्यासोबत त्यांचं सामान उचलण्यासाठी लवाजमा असतो. मात्र राहुलसोबत असं कुणीही नव्हतं. त्याला अशा अवतारात कुणीही ओळखलं नाही.
View this post on InstagramA post shared by Instant Bollywood (@instantbollywood)
राहुल सध्या सिनेसृष्टीपासून दूर असतो. तो कोणत्याही पार्टी, इव्हेंट किंवा पुरस्कार सोहळ्यात दिसत नाही. त्याच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्याला अशा अवतारात पाहून नेटकऱ्यांनाही वाईट वाटलंय. राहुलचा 'आशिकी' हा चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झालेला. हा चित्रपट सलग सहा महिने हाऊसफुल सुरू होता. मात्र त्यानंतर त्याचे सलग २५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यानंतर त्याला कुणीही वाली उरला नाही. सध्या तो सगळ्यांच्या नजरेपासून दूर राहून आयुष्य जगतोय.
Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...