राज्यात उष्णतेपासून दिलासा, आजपासून अवकाळी पावसाचा इशारा
Webdunia Marathi April 18, 2026 06:45 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढले असून उष्णतेची लाट सर्वत्र पसरली असून आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आजपासून येत्या चार दिवस 22 एप्रिल पर्यंत हवामान खात्यानं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

ALSO READ: अकोल्यात तीव्र उष्णतेमुळे हाहाकार; शाळा आता सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा उष्णतेची लाट तीव्र झाली आणि दुसरा आठवडा पूर्णपणे उकाड्याचा राहिला.आता हवामान खात्याने १८ ते २२ एप्रिल दरम्यान चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असून, यामुळे कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

ALSO READ: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा कडून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये १५ जूनपर्यंत हंगामी भाडेवाढ जाहीर

राज्यातील वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या उकाड्यानंतर आता अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस हवामानात बदल होणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By - Priya Dixit

ALSO READ: पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचे हार्ड लँडिंग


© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.