Mastek Company Stock: या कंपनीने गुंतवणूकदारांना पुन्हा आनंदवार्ता दिली आहे. कंपनी 35 व्यांदा गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. कंपनीने एका शेअरवर 320 टक्क्यांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे. स्टॉक मार्केटला कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 5 रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना 16 रुपये लाभांश देण्यात येईल. म्हणजे प्रत्येक एका शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना 320 टक्क्यांचा फायदा होईल. यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने एका शेअरवर 8 रुपयांचा डिव्हिडंड दिला होता.
या कंपनीने पहिल्यांदा 2001 मध्ये एक्स डिव्हिंड ट्रेड केला होता. तेव्हा पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2 रुपयांचा डिव्हिडंड देण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने 6 वर्षांनी 2007 मध्ये लाभांश दिला होता. तेव्हा एका शेअरवर 4.5 रुपयांचा लाभांश देण्यात आला होता.
तर या वर्षी कंपनीने 30 जानेवारी 2026 रोजी एक्स डिव्हिडंड ट्रेड केला होता. तेव्हा कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 8 रुपयांचा फायदा दिला होता. त्यामुळे या कंपनीकडे गुंतवणूकदारांचे पूर्वीपासून लक्ष आहे. आता कंपनीने पुन्हा एकदा लाभांशाची घोषणा केली आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.