मध्य रेल्वेवर आणखी ३४ विशेष गाड्या
esakal April 18, 2026 09:45 PM

मध्य रेल्वेवर आणखी
३४ विशेष गाड्या
मुंबई, ता. १८ : उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सुलतानपूर आणि वाराणसीदरम्यान ३४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी-सुलतानपूर साप्ताहिक विशेष गाडी २१ मे ते १६ जुलैदरम्यान दर गुरुवारी दुपारी २.३५ वाजता सुटणार आहे. २० मे ते १५ जुलैदरम्यान दर बुधवारी पहाटे ४ वाजता सुलतानपूरहून सुटणार आहे. एलटीटी-वाराणसी साप्ताहिक विशेष गाडी ही २२ मे ते १० जुलैदरम्यान दर शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता सुटणार आहे. परतीची गाडी दर गुरुवारी पहाटे १.३५ वाजता वाराणसीहून सुटणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.