Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Marathi Update: दिल्ली कॅपिटल्सने हातचा सामना अवघड बनवला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचली. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवरी हा सामना चुरशीचा झालेला.. लोकेश राहुल व त्रिस्तान स्तब्स यांनी अर्धशतकी खेळी करून DC ला विजयी मार्गावर ठेवले होते, परंतु RCB च्या भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड व कृणाल पांड्या यांनी अप्रतिम मारा करताना सामन्यात चुरस निर्माण केली. पण, RCB कडे शेवटचं षटक फेकण्यासाठी प्रमुख गोलंदाज राहिला नाही आणि रोमारिओ शेफर्डच्या हातात चेंडू सोपवला गेला. त्याने पहिल्या २ चेंडूंत प्रत्येकी १ धाव दिली, पण डेव्हिड मिलरने पुढील ३ चेंडूंत मॅच फिरवली. दिल्लीने ६ विकेट्स राखून बाजी मारली.
DC च्या गोलंदाजांनी RCB ला ८ बाद १७५ धावांवर रोखले. विराट कोहली व फिल सॉल्ट यांनी जशी सुरुवात करून दिली होती, ते पाहता २१५ धावा फलकावर दिसत होत्या. १६ ते २० षटकांत त्यांनी २९ धावांत ४ विकेट्स गमावल्या. मधल्या षटकांमध्येही RCB ला ( ७ ते १५ ) ९.६६ च्या सरासरीने ८७ धावा करता आल्या, परंतु त्यांनी तीन फलंदाज गमावले. अक्षर पटेल, लुंगी एनगिडी व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. RCB च्या गोलंदाजांनीही दमदार सुरूवात करून देताना दिल्लीला १८ धावांत ३ धक्के दिले.
RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viralपथूम निसंकाला ( १) पहिल्याच षटकात भुवनेश्व कुमारने माघारी पाठवले. त्यानंतर तिसऱ्या षटकात भुवीने DC ला आणखी दोन धक्के दिले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या करुण नायरला ( ५) आणि समीर रिझवीला ( २) त्याने तीन चेंडूंच्या फरकाने बाद केले. फिल सॉल्ट आणि जितेश शर्मा यांनी दोन भन्नाट झेल घेताना RCB ला महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. दिल्लीला ६ षटकांत ३ बाद ५० धावा करता आल्या. बंगळुरूचे गोलंदाजाही सुरेख मारा करताना दिसले.
बर्थ डे बॉय लोकेश राहुल एका बाजूने खिंड लढवत होता आणि ८व्या षटकात सुयश शर्माच्या गोलंदाजीवर यष्टीचीत करण्याची संधी जितेशने गमावली. लोकेशने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे RCB विरुद्धचे पाचवे आणि आयपीएलमधील ४२ वे अर्धशतक ठरले. त्याने आणि त्रिस्तान स्तब्सने अर्धशतकी भागीदारी करताना DC ला पुनरागमन मिळवून दिले. पण, कृणाल पांड्याने RCB ला हवी असलेली विकेट मिळवून दिली.
लोकेशने लाँग ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू विराट कोहलीने अविश्वसनीय झेप घेत टिपला. लोकेश ३४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर माघारी परतला अन् स्तब्स याच्यासह त्याची ६९ ( ४४) धावांची भागीदारी संपुष्टात आली. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध किमान ५०० धावा केल्यानंतर सर्वोत्तम सरासरीत लोकेशने बाजी मारली. त्याने RCB विरुद्ध ६९.९च्या सरासरीने ८३९ धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावरही लोकेशच आहे, यावेळी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ६५.१ च्या सरासरीने ९७७ धावा केल्या आहेत.
स्तब्स व अक्षर पटेल यांनी सुरेख खेळ सुरू ठेवला. १३व्या षटकात या दोघांनी रसिख सलामला १६ धावा चोपल्या. DC ला अजूनही ३० चेंडूंत ४६ धावा हव्या होत्या. अक्षरने पोटरीच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला. त्याने १९ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावा केल्या. भुवनेश्वर व हेझलवूड यांनी शेवटच्या षटकांत चांगला मारा केला. दिल्लीला १५, १६, १७ व्या षटकात प्रत्येकी ५ अशा केवळ १५ धावाच करता आल्या. आता दिल्लीवर दडपण वाढले होते. भुवीने २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनेही त्याच्या ४ षटकांत ३८ धावा दिल्या.
शेवटच्या षटकांत दिल्लीला ६ चेंडूंत १५ धावा हव्या होत्या आणि RCB ने रोमारिओ शेफर्डला शेवटचं षटक दिलं. त्याने पहिल्या २ चेंडूंत प्रत्येकी १ धाव दिली, पण डेव्हिड मिलरने तिसरा फुलटॉस चेंडू षटकार खेचला. त्यानंतर पुढील चेंडू कव्हरच्या वरून षटकार खेचून दिल्लीला विजय मिळवून दिला. चौकाराने दिल्लीचा ६ विकेट्स राखून विजय पक्का झाला आणि त्यांनी IPL 2026 Points Table मध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मिलर १० चेंडूंत १ चौकार व २ षटकारासह २२ धावांवर, तर स्तब्स ४७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ६० धावांवर नाबाद राहिला.