Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश
esakal April 19, 2026 01:45 AM

कऱ्हाड ः पाटण नगरपंचायत ज्यांच्या ताब्यात आहेत त्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एखादी पाईपलाईन फुटल्यास दोन-चार तासात दुरुस्त केली जाते. पाटण सारख्या ठिकाणी ते तात्पर्य का दाखवले जात नाही. त्यासाठी हिरेरीने काम करण्याची मानसिकता हवी असा टोला साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणकर यांना नाव न घेता लगावला. पाटण नगर वासीयांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मी ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याचे सूचना देणार असल्याचेही पालकमंत्री देसाई यानी स्पष्ट केले.

साकुर्डी येथील शाळेच्या नूतनीकरण इमारतीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य दिनेश कुंभार, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, गटशिक्षाधिकारी, बिपीन मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, बाजार समिती संचालक प्रकाश पाटील, कोयना दुध संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव देसाई, विश्वासराव कणसे, काशिनाथ जाधव, सुभाष निकम, सुर्यकांत कणसे, श्रीकांत बादल, विक्रम पाटील, सचिन पवार, अविनाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, पाटण शहरातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या विरोधकांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, मला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. पाणीपुरवठा योजनेसाठी नगरपालिकेला दीड कोटींचा निधी होता. मात्र त्याची मुदत संपल्यानंतर अखर्चित राहिला. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै)अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यला त्यांनी तत्वता मान्यता दिली. आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे प्रस्ताव दिला नगर विकास विभागाने त्याला तात्काळ मान्यता दिली आहे. नगर प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना सदर योजना मार्गी लावण्याच्य सूचना दिल्या आहेत. या संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत त्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एखादी पाईपलाईन फुटल्यास दोन-चार तासात दुरुस्त केली जाते. पाटण सारख्या ठिकाणी ते तात्पर्य का दाखवले जात नाही. त्यासाठी हिरेरीने काम करण्याची मानसिकता हवी. पाटण नगर वासीयांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मी ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याचे सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदर्श शाळेसाठी १०० कोटींचा निधी

जिल्हा परिषदेच्या शाळेमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून १०० कोटींचा निधी शाळांना दिला आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेलाही १५३ कोटींचा निधीही देण्यात आल्याचे सांगुण पालकमंत्री देसाई म्हणाले, वस्ती साकुर्डी प्राथमिक शाळेसारख्या शाळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांता पट घटणार नाही. २०२२मध्ये पालकमंत्री असताना जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर मोठा भर दिला. त्याचबरोबर आरोग्य केंद्रांकडेही विशेष लक्ष देत जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध केला. त्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक शाळा मॉडेल स्कूल व अनेक आरोग्य केंद्र स्मार्ट पीएससी बनले आहेत. त्या शाळेत वस्ती साकुर्डीचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.