Anushka Sharma reaction on Virat Kohli catch viral clip : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले. १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ला शेवटच्या षटकापर्यंत झुंजावे लागले. लोकेश राहुल ( KL Rahul) मैदानावर उभा असेपर्यंत सामना DC च्या बाजूने होता. पण, विराट कोहलीच्या अफलातून झेलने राहुलला बाद केले आणि सामन्याला कलाटणी मिळाली.
त्रिस्तान स्तब्स आणि डेव्हिड मिलर यांनी शेवटच्या षटकापर्यंत खिंड लढवली आणि RCB ला पराभवाची चव चाखवली. या सामन्यात विराटची कॅच मार्च चर्चेत राहिली आणि त्यावर अनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल झाली.
RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viralफिल सॉल्टने ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. त्यानंतर टीम डेव्हिड ( २६) हा RCB कडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. DC च्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करताना बंगळुरूला ८ बाद १७५ धावांपर्यंत रोखले. लुंगी एनगिडी, कुलदीप यादव व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला १८ धावांवर ३ धक्के बसले होते.
IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदललोकेश राहुल व स्तब्स यांनी दिल्लीचा डाव सावरताना ६९ धावांची भागीदारी केली. लोकेश ३४ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर झेलबाद झाला. इथे मॅचला कलाटणी मिळाली आणि RCB च्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करायला सुरुवात केली. स्तब्स व अक्षर पटेल यांनी ४७ धावांची आणि स्तब्स व डेव्हिड मिलर यांनी ४५ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. मिलरने २०व्या षटकात तीन चेंडूंत मॅच फिरवली.
दिल्लीने आज २०व्या षटकात १५ धावा केल्या, ज्या त्यांच्या या षटकातील दुसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या. यापूर्वी २०२० मध्ये त्यांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शाहजाह येथे १७ धावा केल्या होत्या.