धायरी: सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वडगाव खुर्दमधील राजयोग सोसायटीजवळ महापालिकेकडून उभारण्यात येत असलेले ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडासंकुल’ निधीअभावी अपूर्ण अवस्थेत पडून आहे. सुमारे १२७० चौरस मीटर क्षेत्रावरील या संकुलाचे काम रखडल्याने स्थानिक खेळाडू, महिला आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
या क्रीडासंकुलात कबड्डी मैदान, क्रिकेट पीच आणि लॉन टेनिस कोर्ट अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा उद्देश होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे या सुविधांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. सध्या संकुलाच्या प्रवेशद्वाराला कुलूप असून परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. मैदानावर राडारोडा साचल्याने संपूर्ण परिसर ओसाड झाला आहे. येथे वीज, पाणी, सुरक्षारक्षक आणि नियमित देखभालीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे येथे असामाजिक घटकांची वर्दळ वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बनवा खास खानदेशी रव्याची संजोरी; खुसखुशीत, गोड आणि कढईत टाकताच फुगणारी परफेक्ट रेसिपीवडगाव पुलापासून खडकवासला परिसरापर्यंत महापालिकेचे हे एकमेव क्रीडा मैदान आहे. ते वापरासाठी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी आणि खेळाडूंना सरावासाठी अडचण निर्माण झाली आहे. नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा अशा प्रकारे वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. भवन विभागाने हे काम तातडीने पूर्ण करून क्रीडा विभागाच्या ताब्यात द्यावे, जेणेकरून संकुल खेळाडूंसाठी खुले होईल, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
"महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेले क्रीडा संकुल अपूर्ण आणि बंद अवस्थेत ठेवणे ही दुर्दैवी बाब आहे. सिंहगड रस्ता परिसरातील मुलांना सरावासाठी जागा नाही. प्रशासनाने तातडीने काम पूर्ण करून मैदान सुरू करावे."
- अनिकेत देशमुख, स्थानिक नागरिक
कुंभ राशी साप्ताहिक राशिफल : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) पुत्रासंबंधित चिंता दूर होऊन घरात आनंद वाढणार"क्रीडासंकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी भवन विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. आवश्यक निधी आणि प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर संकुल कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत."
- गोविंद दांगट, सहाय्यक आयुक्त, क्रीडा विभाग, पुणे महापालिका