Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव
esakal April 19, 2026 11:45 AM

Akshaya Tritiya triggers buying rush as gold and silver prices witness sharp spike across India : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर, सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम एक हजार १०० रुपयांची, तर चांदीमध्ये सात हजारांची वाढ झाली आहे. सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाव शुक्रवारी (ता. १७) एक लाख ५१, ७०० रुपये होता. त्यात ११०० रुपयांची वाढ होऊन शनिवारी तो १ लाख ५२, ८०० रुपयांपर्यंत (विना जीएसटी) पोहोचला. तर, चांदीचे दर प्रतिकिलो दोन लाख ५३ हजार (विना जीएसटी) होते. त्यात सात हजारांची वाढ होऊन चांदी २ लाख ६० हजार रुपयांवर पोचली आहे.

दरम्यान, अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सकाळपासूनच शहरातील सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. सोन्याला केवळ अलंकार म्हणून न पाहता, एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहण्याकडे ग्राहकांचा कल होता.

विशेष म्हणजे, यंदा केवळ जड दागिन्यांवर भर न देता ग्राहकांनी हलक्या वजनाचे दागिने, सोन्याची नाणी, वाळे, लग्नसराईचे दागिन्यांना मोठी पसंती दिली. त्याचबरोबर तरुण पिढीने डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ यांसारख्या आधुनिक गुंतवणूक पर्यायांची निवड केल्याने खरेदीचे स्वरूप बदलत असल्याचे दिसते.

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

अक्षय तृतीया हा भारतीयांसाठी सोने खरेदीचा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. सोने-चांदीचा दर उच्चांकी पातळीवर असतानाही ग्राहकांचा जो विश्वास पाहायला मिळाला, तो सोन्याशी असलेले लोकांचे भावनिक नाते अधोरेखित करतो. ग्राहक आता अधिक जागरूक झाले असून सुलभ हप्ते आणि नियोजित गुंतवणुकीद्वारे सोने खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त! अक्षय तृतीयेला भाव पुन्हा वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर कमी असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेकांनी मुहूर्तावर दागिने नेता यावे म्हणून ॲडव्हान्समध्ये बुकिंग केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.