पुणे: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. सोने-चांदी, वाहने, कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सणाच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असल्यामुळे नागरिक विविध बाजारपेठांकडे वळल्याचे चित्र आहे.
सराफ बाजारात विशेष चैतन्य दिसून येत आहे. पारंपरिक मान्यतेनुसार या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी यंदा अनुकूल वातावरण मिळाले आहे.
Sunil Gawde Artist Biography : "जे मला डोळे मिटल्यावर दिसतं, तेच मी चितारतो!" आंतरराष्ट्रीय कलाकार सुनील गावडे यांच्या यशाचे 'हे' आहे गुपित.सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. वधू-वरांसाठी खास डिझाईन केलेले दागिने, हलक्या वजनातील आकर्षक सेट तसेच पारंपरिक आणि आधुनिक डिझाइन्सचा संगम असलेले दागिने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
अनेक सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती, घडणावळीत सवलत तसेच एक्स्चेंज ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.
याशिवाय आकर्षक सवलतींचा लाभ घेण्यासाठी वाहन विक्री केंद्रे, कपड्यांची दुकाने आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीच्या ठिकाणीही ग्राहकांची लक्षणीय गर्दी दिसून येत आहे.
आंबे खरेदीसाठी नागरिकांची गर्दीशहरातील फळबाजारात आंब्यांच्या खरेदीसाठीही मोठी गर्दी होत आहे. हापूस, केसर, पायरी अशा विविध जातींचे आंबे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे फळबाजारातही सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहन नोंदणी वाढली
ग्राहकांनी कार, दुचाकी तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केली आहे. विविध शोरूम्समध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली होती. वाहन कंपन्यांकडून आकर्षक सवलती, एक्स्चेंज बोनस तसेच कमी व्याजदरातील कर्ज योजना उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. विशेषतः दुचाकी आणि लहान मोटारींची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं"सोन्याचे भाव सध्या स्थिर असल्यामुळे आम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठीही तयारी सुरू आहे, त्यामुळे हा योग्य काळ वाटतो. यावेळी सवलतीही चांगल्या मिळत असल्याने खरेदी अधिक सोयीची झाली आहे."
- प्रियांका देशमुख, ग्राहक