मिथुन राशीच्या जातकांसाठीही हा काळ शुभ ठरणार आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. गुंतवणुकीतून उत्तम नफा मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा संपत्तीचा लाभ होऊ शकतो. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही योग्य वेळ असू शकते. मात्र, या दरम्यान आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते आणि विद्यमान व्यवसायाचा विस्तार होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून शुभवार्ता येऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण होईल आणि घरात आनंदी वातावरण राहील. संपत्तीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)