सस्पेन्स वाढला; Bigg Bossमधील टॉप 2 स्पर्धक कोण? फिनालेपूर्वी नावे समोर, रात्री घोषणा होणार
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 19, 2026 08:13 PM

Bigg Boss Marathi Season 6 Finale Winner Prediction: टास्क, इमोशन, भांडण आणि  प्रचंड राड्यानंतर बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi Season 6) अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये सध्या ट्रॉफी  जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज फिनाले एपिसोडमध्ये (Bigg Boss Marathi Finale) बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?  त्या विजेत्या स्पर्धकाचं नाव समोर येईल.   तन्वी कोलते,  राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद या पाच स्पर्धकांपैकी एका स्पर्धासाठी बिग बॉसच्या घरातील नशीबाचं दार उघडणार.  हे टॉप 5 स्पर्धक विजेतेपद आणि बक्षिसाची रक्कम जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत.  बिग बॉसच्या घरातील स्पर्धकाने  प्रेक्षकांशी एक घट्ट नाते निर्माण झाले आहे.  यामुळे ही स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.   बिग बॉस मराठी 6चा विजेता कोण होणार?  हे जाणून घेण्यास प्रत्येक चाहता आणि प्रेक्षक आतुर आहे. 

फिनालेकडे सर्वांच्याच नजरा, नेमका कोणता स्पर्धक जिंकणार? (Who will win Bigg Boss Marathi 6 trophy)

आज बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा समारोप होईल.  कलर्स मराठी या वाहिनीवर रात्री 8 वाजता  महाअंतिम सोहळा प्रसारित होणार आहे.  ज्यांना टीव्ही पाहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.  आपण टीव्ही किंवा ऑनलाईनवर या अंतिम सोहळ्याचा नक्कीच आनंद घेऊ शकता. 

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा टॉप 2 स्पर्धक कोण? (Bigg Boss Marathi top 2 contestants)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. व्होटिंग लाईन्स आता बंद झाल्या आहेत.  सर्वांचेच लक्ष  विनर कोण होणार? कुणाच्या घरी ट्रॉफी जाणार? याकडे लक्ष आहे.  दरम्यान, टॉप 2 स्पर्धक नेमके कोण असणार? याकडेही सर्वांच्याच नजरा आहेत.  सोशल मीडियावरील चर्चा आणि काही रिपोर्ट्सनुसार, मतांमध्ये  स्पर्धक  तन्वी कोलते ही सध्या आघाडीवर असल्याची माहिती आहे.  विशाल कोटियन किंवा राकेश बापट हे दुसऱ्या स्थानावर असतील, अशी माहिती आहे.  ही माहिती पोल्स आणि ऑनलाईन ट्रेंडवर आधारीत आहे. विजेता आणि उपविजेता  आज रात्रीच्या महाअंतिम सोहळ्याच्या भागातच जाहीर केले जातील. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.