तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 20, 2026 01:43 AM

Bigg Boss Marathi Season 6 Winner: 11 जानेवारी 2026 रोजी कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठी सिझन 6ने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. 19 एप्रिल रोजी सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. 100 दिवसांच्या या खेळात 5ही स्पर्धकांनी आपली जागा निर्माण केली होती.  टॉप 5 स्पर्धकांमधून कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकणार?  याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. अखेर याचं उत्तर मिळालं. तगड्या स्पर्धकांना मागे टाकत, तन्वी कोलते हिने बाजी मारली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि उत्कृष्ट टास्क परफॉर्मन्समुळे या स्पर्धकाने  बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे तन्वी कोलतेवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

अभिनेता रितेश देशमुखे याने होस्ट केलेला यंदाचा सिझन प्रचंड गाजला. विशेष म्हणजे भाऊचा धक्का या एपिसोडला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळालं.  टॉप 5 स्पर्धकांची नावे  जाहीर होताच, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलतेला तिकीट टू फिनालेचा मान मिळाला होता.  

तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन हे स्पर्धक रेसमध्ये होते.  पाचही स्पर्धकांनी मास्टरमाईंडने प्रत्येक टास्क पूर्ण केले.  शेवटी 2 स्पर्धक उरले होते. तन्वी कोलतेने सहाव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.  

17 स्पर्धकांमध्ये सुरू झालेल्या प्रवासात काही स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली. तगड्या स्पर्धकांनी टास्क खेळून अनेकांनी आपल्या बाजूने मत वळवून घेतलं. मात्र, तरीही शांत, सयंमाने तन्वी कोलतेने ट्रॉफीपर्यंत प्रवास पूर्ण केला.  बिग बॉस मराठीचा सहावा सिझन रंजक ठरला, पुरेपूर या सिझनने मनोरंजन केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

सुरुवातीपासून शांत सयंमीपणे टास्क खेळणाऱ्या तन्वीने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तिनं राकेश बापटला मागे टाकत तिकीट टू फिनालेचा मान पटकावला.  तन्वीच बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, असा अनेकांनी अंदाज वर्तवला होता.  तिला प्रेक्षकांसह घरातील स्पर्धकांचाही पाठिंबा होता. 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.