Bigg Boss Marathi 6: लोकप्रिय मराठी कार्यक्रम बिग बॉस मराठी 6 चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. या सीझनमध्ये तन्वी कोलते हिने आपला जलवा दाखवत ट्रॉफीवर नाव कोरलय. चाहत्यांच्या वोटिंगमुळे आणि उत्तम खेळामुळे यंदाचा विजेती तन्वी कोलते ठरली आहे. तर उपविजेता राकेश बापट ठरलाआहे.
सर्वाधिक वोटदीपाली सय्यद, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियाल, तन्वी कोलते हे बिग बॉस सीझन 6 चे पाच फायनलिस्ट होते. दरम्यान जास्त वोट मिळाल्यामुळे विशाल कोटियाल, राकेश बापट, तन्वी कोलते हे ३ सदस्य फायनलिस्ट ठरले. त्यानंतर तिसऱ्या स्थानी विशाल कोटियाल बाहेर परंतु शेवटच्या क्षणी तन्वीनं जास्त वोट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलंय.
काय बक्षिस मिळालं?यंदाच्या सिझनच्या तन्वीला बिग बॉसची ट्रॉफी मिळाली. तसंच त्याचसोबत 15 लाख रुपयांचा चेक, ई-स्कूटी, पु. ना. गाडगीळ यांच्याकडून 10 लाख रुपयांचं गिफ्ट वाऊचर सुद्धा मिळालय. त्यामुळे तन्वीवर बक्षिसांचा वर्षाव झालाय.
View this post on Instagram
यंदाच्या सीझनमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना ‘काटा’ आणि ‘टोळी’ असे दोन गट पाहायला मिळाले. शेवटच्या चार फायनिलस्टमध्ये काटा गटाचे तन्वी कोलते, राकेश बापट आणि टोळीचे अनुश्री माने आणि विशाल कोटियाल हे सदस्य होते. परंतु चौथ्या स्थानी अनुश्री घराबाहेर पडली. तर तिसऱ्या स्थानी विशाल घराबाहेर पडला.
‘बिग बॉस मराठी ६’चा विजेता आधीच ठरला? ग्रँड फिनालेपूर्वी नावाची यादी लीक, 'या' सदस्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा