IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral
esakal April 20, 2026 04:45 AM

Arshdeep Singh & Ricky Ponting angry reaction IPL 2026 viral moment: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अपराजित मालिका कायम राखताना लखनौ सुपर जायंट्सवर ५४ धावांनी विजय मिळवला. PBKS च्या २५४ धावांचा पाठलाग करताना LSG ला २०० धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबने हा सामना जिंकून आयपीएल गुणतालिकेत आपली अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. पण, या सामन्यात शशांक सिंगकडून ( Shashank Singh) झालेल्या दोन चुका नजरअंदाज करण्यासारख्या नव्हत्या. त्याने दोन सोपे झेल टाकले आणि त्यामुळे अर्शदीप सिंग व मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. त्यात सामन्यातनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) त्याच्यासोबत केलेल्या कृतीची चर्चा रंगली आहे.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २५४ धावा उभ्या केल्या. आयपीएलच्या या पर्वातील या सर्वोच्च धावसंख्या ठरल्या. यापूर्वी हा विक्रम RCB ने CSK विरुद्ध २५० धावा करून केला होता. प्रियांश आर्यने ३७ चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ९३ धावांची वादळी केली. त्याला साथ मिळाली कॉनली कुपर याची. त्यानेही ४६ चेंडूंत ८७ धावा चोपताना ८ चौकार व ७ षटकार लगावले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० चेंडूंत १८२ धावांची भागीदारी केली, जी पंजाबसाठी आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली.

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

लखनौच्या प्रिंस यादवने ४ षटकांत २५ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर मनिमरन सिद्धार्थनेही २ बळी टिपले. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगला जोर लावला होता, परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक रन रेट ते राखण्यात अपयशी ठरले. मिचेल मार्शने २८ चेंडूंत ४० धावा केल्या. आयुष बदोनीने ३५ धावा करताना पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. कर्णधार रिषभ पंतही २३ चेंडूंत ४३ धावा करून माघारी परतला.

एडन मार्करम व मुकुल चौधरी यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या, पंरतु संघ ५४ धावांनी कमी पडला. एडन २२ चेंडूंत ४२ धावांवर शेवटच्या षटकात बाद झाला, तर मुकुल २१ धावांवर नाबाद राहिला. खरंतर या दोघांची विकेट आधीच पडली असती, परंतु शशांकच्या चुकीने त्यांना जीवदान मिळाले आणि लखनौचा संघ इथपर्यंत पोहोचला.१८व्या षटकात एडनने अर्शदीप सिंगने टाकलेला चेंडू कव्हर्सवरून टोलवला होता. शशांक तिथे उभा होता आणि त्याला झेलही टिपता आला असता, परंतु त्याने चेंडू जाऊ दिला आणि एडनला षटकार मिळाला. शशांकची ही कृती पाहून अर्शदीप व रिकी पाँटिंग संतापवे. शशांकने दोघांची माफी मागितली.

१९व्या षटकात आणखी एक अशीच चूक झाली. मुकुलने डीप स्क्वेअर लेगला चेंडू टोलवला आणि शशांकच तिथे उभा होता. हा झेल सहज टिपला जाईल असे वाटत असताना शशांकच्या हातून चेंडू निसटला. सीमारेषेवर उभा असलेल्या श्रेयस अय्यरला हसू आवरेना झाले. मुशीर खान व अन्य सहकारीही हसू लागले. सामन्यानंतर शशांक त्याचा चेहरा लपवताना दिसला. पण, श्रेयस व पाँटिंगने त्याला मिठी मारली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.