बिग बॉस मराठी 6 ची विजेती ठरली तन्वी कोलते, टॉफीसह मिळाल्या 'या' गोष्टी
esakal April 20, 2026 04:45 AM

TANVI KOLTE WINS BIGG BOSS MARATHI 6 TROPHY: बिग बॉस मराठीच्या सहावा सिझनला अखेर विजेता मिळाला आहे. तन्वी कोलते ही यंदाच्या सीझनची महाविजेता ठरली आहे. राकेश बापट हा या खेळाचा रनरअप झाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये टॉप फायनलिस्ट यांना महाराष्ट्रातून भरभरून वोट करण्यात आलं. परंतु शेवटी तन्वी हिने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. या पर्वात राकेश बापट उपविजेता ठरला आहे.

तन्वीला ट्रॉफीसह १५ लाख रुपयांचा चेक देण्यात आलाय. तसंच ई-स्कूटी, पु. ना. गाडगीळ यांच्याकडून 10 लाख रुपयांचं गिफ्ट वाऊचर सुद्धा मिळालय. तसंच रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली आहे.

View this post on Instagram