Free Health Camp: कोळवण येथे आस्था हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर
esakal April 20, 2026 04:45 AM

पांडुरंग साठे

कोळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोळवण परिसरातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन आस्था मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, पिरंगुट व विशाल उत्तम बर्वे यांच्या वतीने शनिवार ता.१८ रोजी करण्यात आले होते.

या शिबिरात ९५ नागरिकांच्या मोफत वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या. शिबिरात सहभागी नागरिकांना त्यांच्या आजारांनुसार औषधोपचार व पुढील वैद्यकीय उपचारासाठी सल्ला देण्यात आला.

यावेळी परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.