बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 20, 2026 02:43 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ (Bigg Boss Marathi Season 6) चा बहुप्रतिक्षित महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या 100 दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या पर्वाचा अखेर भव्य शेवट झाला असून तन्वी कोलते (Tanvi Kolte) हिने विजेतेपद पटकावत ‘महाविजेती’चा मान मिळवला. बिग बॉसच्या घरी तन्वी कोलते म्हणून आले होते, आता बाहेर जाताना 'तन्वी कोलते ब्रँड' म्हणून जात आहे, बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, अशी पहिली प्रतिक्रिया तन्वी कोलते हिने दिली.

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर प्रसारित झालेल्या या सिझनने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मने जिंकली होती. अंतिम क्षणापर्यंत उत्कंठा कायम असताना विजेतेपदाची घोषणा होताच वातावरण जल्लोषात न्हाऊन निघाले.

Bigg Boss Marathi Winner : तन्वी कोलतेची दमदार कामगिरी

तन्वी कोलतेने संपूर्ण सिझनमध्ये आपल्या स्पष्टवक्तेपणा, जिद्द आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्रेक्षकांशी जुळलेले नाते आणि ठाम भूमिका यामुळे तिने हा किताब पटकावला.

Bigg Boss Winner Prize Details : 15 लाखांचे बक्षीस आणि खास गिफ्ट्स

विजेत्याला कलर्स मराठीकडून 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली. याशिवाय पु. ना. गाडगीळ अँड सन्स (PN Gadgil and Sons) तर्फे 10 लाख रुपयांचे वाउचर, रेवा डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी सुविधा आणि तुनवाल ई मोटर्स (Tunwal E Motors) कडून ‘लिथिनो प्रो’ ई-बाईक देण्यात आली.

Tanvi Kolte Reaction : विजयानंतर भावना व्यक्त

विजेती ठरल्यानंतर तन्वी कोलते म्हणाली की, हा प्रवास तिच्यासाठी खूप खास होता. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हीच माझी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते, असे ती म्हणाली.

तन्वी कोलते म्हणाली की, "हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते, विचारत होते काय काम केलंस? तेव्हा वाईट वाटायचे. पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून, बाहेर जात आहे ते तन्वी कोलते हा ब्रँड बनून”.

Grand Finale Highlights : 100 दिवसांचा भावनिक प्रवास संपला

या घरात 100 दिवस सदस्यांनी कॅमेरांच्या नजरकैदेत राहत मैत्री, वाद, भावनिक चढ-उतार आणि स्पर्धेचे अनेक रंग अनुभवले. प्रत्येक सदस्याचा खरा स्वभाव प्रेक्षकांसमोर आला आणि या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

Management Statement : निर्मात्यांची प्रतिक्रिया

जिओस्टार (JioStar) मराठी क्लस्टरचे कार्यकारी उपाध्यक्ष सतीश राजवाडे (Satish Rajwade) यांनी सांगितले की, या सिझनने प्रेक्षकांना वेगळा अनुभव दिला. अनपेक्षित ट्विस्ट, नात्यांतील बदल आणि संघर्षामुळे हा प्रवास विशेष ठरला.

Entertainment Impact : महाराष्ट्रात पुन्हा लोकप्रियता

‘बिग बॉस मराठी 6’ने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी छाप उमटवली. मनोरंजन, भावना आणि स्पर्धेचा संगम असलेला हा सिझन प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणार आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.