यश डागा, डायरेक्टर, मल्टी इन्व्हेस्टमेंट्स
संकल्पनात्मक (थीमॅटिक) गुंतवणूक ही दीर्घकालीन दृष्टीने संरचनात्मक बदलांचा लाभ घेण्यासाठीची अत्यंत परिणामकारक पद्धत आहे, हे सिद्ध झाले आहे. मग ते डिजिटलायझेशनमधून असो, वाढत्या उपभोगवादातून असो किंवा उत्पादन क्षेत्रातील उभारीमुळे असो. एकट्यादुकट्या कंपन्या किंवा उद्योगांपेक्षा व्यापक आर्थिक संकल्पनांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता हा संकल्पनात्मक गुंतणुकीचा पाया असतो. मात्र, त्यात काही आव्हानेही असतात.
विविध आव्हानेबाजारातील बदल
यातील पहिले आव्हान म्हणजे बाजाराच्या वातावरणात सतत होत असलेले बदल. व्याजदर, महागाई, धोरणे आणि तरलता यांसारख्या व्यापक आर्थिक (मॅक्रोइकॉनॉमिक) अनेक घटकांनुसार आघाडीची क्षेत्रे बदलतात. एका टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणारी क्षेत्रे इतर टप्प्यांमध्ये कमी कामगिरी करतात, असे इतिहासातील कलांमधून दिसून येते. त्यामुळे वेळ साधणे (टायमिंग) हे महत्त्वाचे. परंतु, अवगत करण्यास कठीण असे कौशल्य ठरते. पोर्टफोलिओमधील जोखमीचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करण्याची आणि केवळ क्षेत्रांमध्येच नव्हे, तर विविध बाजार भांडवलातील संधी ओळखण्याची गरज, यामुळे ही जटिलता आणखी वाढते.
गुंतवणूकदारांचे वर्तन
गुंतवणूकदारांचे वर्तन हे आणखी एक आव्हान असते. बाजाराच्या चक्रामुळे बऱ्याचदा भावनेच्या भरात निर्णय घेण्याची क्षमता आणखी वाढते, कारण गुंतवणूकदार मजबूत रॅलीनंतर थीमचा पाठलाग करतात आणि मंदीच्या काळात बाहेर पडतात. मात्र, या प्रकारच्या प्रक्रियेमुळे थीममागील मूळ कल्पना वास्तविक असली, तरीही दीर्घकालीन फायद्यांना फटका बसू शकतो.
याशिवाय, गुंतवणूक पोर्टफोलिओचे सतत व्यवस्थापन आणि पुनर्संतुलन करणे याचाही प्रश्न असतो. यासाठी मॅक्रोइकॉनॉमिक आणि किमतींच्या संकेतांचा उपयोग करून योग्य वेळ ओळखणे आवश्यक असते. गुंतवणूक कधी मागे घ्यायची किंवा कमी करावी याचीही गरज त्यामुळे वाढते, त्यामुळे करांचा विचार करणे यांसारखी लॉजिस्टिकची आव्हानेही समोर येतात.
हातात असलेला उपाय
अशा वेळी एक सुरचित दृष्टिकोन विशेष महत्त्वाचा ठरतो. अशा दृष्टिकोनामध्ये विकसनशील थीममधील विविधता आणि धोरणात्मक मालमत्ता वितरण यांचा संयोग साधला जातो. यात बाजारचक्रांचा सामना करण्यासाठी स्थिरता-केंद्रित मालमत्ता (जसे की डेट) बाजार भांडवलाच्या क्षेत्रात लवचिकपणे संधी शोधणे यांचे एकत्रीकरण समाविष्ट असू शकते.त्याच वेळी दीर्घकालीन थीमॅटिक ट्रेंडवर लक्ष केंद्रित ठेवण्याचा गाभा कायम ठेवला जातो.
फंड ऑफ फंड्सचा पर्याय
अशा पर्यायांच्या शोधात असलेले गुंतवणूकदार फंड ऑफ फंड्सचा (एफओएफ) विचार करू शकतात. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲग्रेसिव्ह हायब्रिड ॲक्टिव्ह ‘एफओएफ’ (पूर्वीचा थीमॅटिक ॲडव्हान्टेज एफओएफ) या फंडात क्षेत्रीय, थीमॅटिक आणि मार्केट-कॅप संधींवर ६५-८० टक्के इक्विटी फोकस ठेवण्यात येतो, त्याच वेळेस स्थिरतेसाठी डेटचाही (२०-३५ टक्के) समावेश केला जातो. त्याने संपत्तीनिर्मितीसाठी सातत्याने दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड दाखवून दिला आहे. या फंडाने ३१ मार्च २०२६ पर्यंत, तीन वर्षांसाठी १५.११ टक्के सीएजीआर (चक्रवाढ वार्षिक वृद्धिदर), पाच वर्षांसाठी १४.९१ टक्के आणि १० वर्षांसाठी १४.४७ टक्के दर नोंदवला आहे.