नागपूर: विदर्भात उन्हाचा कहर सुरूच असून, रविवारी पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. नागपूरच्या पाऱ्याने या मोसमातील उच्चांकी ४४.४ अंशांपर्यंत झेप घेतली. तर अकोला आणि वर्ध्याचे तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे. सोमवारपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे वैदर्भीयांना दोन-तीन दिवस उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील भीषण लाटेने सध्या अक्षरशः उग्र रूप धारण केले आहे. रविवारी सूर्याचा प्रकोप अकराही जिल्ह्यांमध्ये प्रकर्षाने जाणवला. नागपूरच्या तापमानात आज ०.२ अंशांची वाढ होऊन पारा ४४.४ अंशांवर गेला.
Nagpur News: तापलेल्या रस्त्यावर जगण्यासाठी संघर्ष; सकाळी १० ते ५ विक्री मंद; उन्हामुळे भाजीपालाही होतो खराबयेथे या मोसमातील उच्चांकी तापमानाची तर नोंद झालीच, शिवाय मागील तीन वर्षांतीलही हे दुसरे सर्वाधिक तापमान ठरले. यापूर्वी २०२२ मध्ये ३० एप्रिल रोजी नागपूरचा पारा ४५.२ अंशांवर गेला होता.
त्यानंतर मध्यंतरी एकदाच (१९ एप्रिल २०२५) तापमान ४४.७ पर्यंत गेले होते. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला आणि वर्धा येथे झाली. येथे नोंद झालेले तापमान संपूर्ण राज्यात सर्वाधिक होते. याशिवाय अमरावती, गडचिरोली, वाशीम, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपूर या शहरांमध्येही उन्हाचे तीव्र चटके जाणवले.
Premium|Operation Sindoor 2025 : ऑपरेशन सिंदूर माध्यमे आणि माहितीची लढाई प्रमुख शहरातील कमाल तापमान (रविवारी : अंश सेल्सिअसमध्ये )अकोला : ४५.०
वर्धा : ४५.०
नागपूर : ४४.४
अमरावती : ४४.२
गडचिरोली : ४३.२