मेहकर: धावत्या लक्झरी बसमध्ये चालक आणि वाहकाने मोबाइलवर रील बनविण्याच्या नादात केलेल्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अवघ्या दीड वर्षाच्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल १७ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता.१९) एप्रिल रोजी पहाटे ५:४८ च्या सुमारास मेहकर समृद्धी महामार्गाजवळील फर्दापूर टोल नाक्यासमोर घडली.
मुंबईहून पुसदकडे समृद्धी महामार्गाने निघालेली एमएच २९ बीई २३३३ क्रमांकाची बंजारा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस रविवार पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्याजवळ आली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ३ वाजेनंतर दुसऱ्या चालकाने गाडीचा ताबा घेतला. हा चालक गाडी चालवताना मोबाईलवर गाणे लावून रील (व्हिडिओ) बनवत होता.
वीजेचा लपंडाव, सोलापूर शहराला आता ४ दिवसाआड पाणी! औज बंधारा कोरडा, पाकणीचे जलशुद्धीकरण केंद्र बंद, सोरेगावचा पंप जळाला, वाचा...केबिनमध्ये बसलेल्या प्रवाशांनी त्याला वारंवार हटकले, तरी ही त्याने दुर्लक्ष केले. मेहकर नजीकच्या फर्दापूर टोल नाक्याजवळ उतारावर गाडी असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या भीषण अपघातात पियुष यशपाल राठोड (वय दीड वर्ष) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बस उलटताना समोरून येणाऱ्या कारलाही धडक बसली. एमएच ४० ईडी १३४८ क्रमांकाच्या कारमधील रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांचे कुटुंब जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरड, किंकाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने मेहकर व परिसरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा अपघातात सतरा जखमीया अपघातात अस्वद अहमद महबूब अहमद (वय ११, रा. पुसद), सुशील खडसे, रूपचंद गजानन बावनकुळे गंभीर जखमी झाले आहेत. तर वैभव श्रीधर धुळे (वय २४, रा.पुसद), शांती संजय जाधव (वय ३०, रा. डिग्रस), विजय बाबूराव राठोड (वय ५०, रा. मुंबई), किरण यशपाल राठोड, आशा देवकर, किशन चव्हाण (वय २२), मैफूज अहमद (वय ४८), उमी हाणी अहमद (वय ४), योगिता रूपचंद बावनकुळे, अविनाश राठोड, राजेश चव्हाण, लवकित चव्हाण, पूजा राठोड, ध्रुवी राठोड (लहान मुलगी). हे किरकोळ जखमी झाले आहेत.
नागरिकांमध्ये संतापटोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सुद्धा जिवाची पर्वा न करता बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अनेकांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यास मदत केली. जखमींना मेहकर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर अर्धा तास एकही डॉक्टर उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. केवळ ब्रदर आणि सिस्टर यांनी प्राथमिक उपचार केले. ड्युटीवरील डॉक्टर घरी असल्याचे समजताच नागरिकांनी आणि जखमींच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला.