Sensex and Nifty Today: जागतिक घडामोडी आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सौम्य घसरणीसह झाली मात्र काही मिनिटांतच बाजार पुन्हा हिरव्या रंगात व्यवहार करायला लागला. पण ही तेजीही खूप काल टिकली नाही त्यामुळे संकलकह्या सत्रात बाजारात एकंदरीत दबाव दिसून आला.
सकाळी 9.40 वाजता सेन्सेक्स निर्देशांक 30 अंकांनी वाढून 78,530 अंकांवर व्यवहार करत होता तर निफ्टी 50 निदेशांक 7 अंकांनी वाढून 24,360 अंकांवर व्यवहार करत होता.
विस्तृत बाजारात मात्र दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप सुमारे 0.20 टक्के, तर स्मॉलकॅप 0.64 टक्क्यांनी खाली आला.
RBI Gold: RBI च्या निर्णयाने गुंतवणूकदारांची चांदी! गोल्ड बॉन्डमध्ये देणार तिप्पट रिटर्न, सोबत 2.5% व्याज बाजारातील व्यवहारHDFC Bank, Kotak Mahindra Bank, Reliance, Tata Steel, Jio Financial Services, Hindalco Industries, Tata Motorsआणि IndiGoहे शेअर्स घसरले होते. तर Trent, Ultratech, State Bank of India, ICICI Bank आणि Adani Ports हे शेअर्स टॉप गेनर्स होते.
सेक्टरनिहाय पाहता, मेटल क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली. रिअल्टी आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रही कमकुवत राहिले. मात्र PSU बँक आणि मीडिया क्षेत्राने तुलनेने चांगली कामगिरी केली.
तिमाही निकालआज Bank of Maharashtra, PNB Housing Finance, SML Isuzu आणि Ugro Capital या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने यांचे शेअर्स फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे.
ICICI तेजीतICICI Bank च्या शेअरमध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळाली. मजबूत तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर बँकेचा शेअर जवळपास 2 टक्क्यांनी वाढला. NSEवर व्यवहारादरम्यान हा शेअर ₹1,373.20 या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला.
Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या ताजे भाव IPO बाजारCitius Transnet InvIT च्या IPOचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी या IPO ला 0.69 पट सबस्क्रिप्शन मिळाले.
Mehul Telecom च्या IPOचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी या IPOला तब्बल 3.64 पट सबस्क्रिप्शन मिळाले.