हर्बल चहाने करा वेट लॉस
Marathi April 21, 2026 05:25 AM




जर तुम्ही चहाचे शौकीन आहात आणि तुम्हाला वजनही कमी करायचे आहे तर मग तुमची ही समस्या हर्बल चहाने दूर होऊ शकते. त्यासाठी कोणते हबर्ल चहा तुमच्यासाठी फायदेशीर आहेत ते बघूया.

हळद, काळीमिरी चहा

जर तुम्हाला वारंवार पोट फुगण्याची समस्या असेल तर हा हळद आणि काळ्यामिरीच्या चहाने तुम्हाला लगेच आराम मिळेल. त्यासाठी १ कप गरम पाण्यात १ छोटा चमचा हळद पावडर, आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकावी. हे मिश्रण ३ मिनिट ठेवावे. नंतर कोमट झाल्यावर एक एक घोट प्यावे.

पुदीना चहा
पोटातील गॅस कमी करण्याबरोबरच पचनशक्ती सुरळीत होण्यासाठी पुदीन्याचा चहा खूपच उपयोगी ठरतो. त्यासाठी एक कप गरम पाण्यात एक पेपरमिंट टी बॅग किंवा ५-६ पुदीन्याची पानं आणि थोडेस आलं टाकाव. मिश्रण गरम असतानाच प्याव. पोटाला आराम मिळतो.

लिंबू आणि चिया सीड्स चहा
लिंबू आणि चिया सीड्स चहा पचनशक्ती वाढवतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यासाठी १ कप उकळत्या पाण्यात १ चमचा लिंबाचा रस आणि थोड आलं टाकावे. ते कोमट झाल्यावर त्यात एप्पल व्हिनेगर आणि चिया सीड्स टाकून प्यावे.

ग्रीन टी आणि लिंबू रस चहा

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टी आणि लिंबू रस चहा बेस्ट आहे. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासही हा चहा उपयोगी आहे. त्यासाठी १ कप गरम पाण्यात ग्रीन टी बॅग आणि ३ लिंबाच्या फोडी टाकाव्यात थोडा वेळ ठेवून नंतर हा चहा प्यावा.



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.