Latest Marathi News Live Update : अशोक खरातचे ठाणे कनेक्शन उघडकीस
esakal April 21, 2026 05:45 PM
Ashok Kharat : अशोक खरातचे ठाणे कनेक्शन उघडकीस

- अशोक खरातचे कनेक्शन ठाण्यातही उघडकीस..

- ⁠ठाण्यातील एक माजी अधिकारी होता अशोक खरातच्या संपर्कात

- ⁠महेश अहेर नावाचा वादग्रस्त अधिकारी होता अशोक खरातच्या संपर्कात

- ⁠महेश अहेर ने ठाणे मनपातील एका लिपिक महिलेला नेले होते अशोक खरातकडे

- ⁠महेश अहेर याने त्या महिलेला अशोक खरातच्या नाशिक येथील ओकस कार्यालयात नेले होते

भारतीय कामगार सेनेच्या 58व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरेंचे भाषण

भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत  उद्धव ठाकरे यांनी भाषण दिले. यावेळी भाषणात ते म्हणाले की, कोणी कितीही मोठा असला तरी काळ बदलत असतो आणि प्रत्येकाचा काळ जातो. माणसात आत्मविश्वास असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही. तसेच, लोक येतात आणि जातात, पण त्यांच्या कर्मांची छाप कायम राहते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. कणकवली शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे पाऊस सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांचे विक्रीसाठी आणलेले साहित्य भिजून गेले होते. 

रेवदंडा परिसरात अवकाळी पाऊस

रेवदंडा परिसरात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली.

पहाटेच्या वेळी या पावसा दरम्यान बागमळा येथे ताडाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळून खाक झाले आहे.

सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Nashik Live: टीसीएस प्रकरणात धक्कादायक खुलासे, पीडितेच्या फिर्यादीत गंभीर आरोपांची मालिका

नाशिकमध्ये समोर आलेल्या या प्रकरणात पीडित तरुणीने केलेल्या फिर्यादीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपींकडून वारंवार अश्लील आणि अवमानकारक टिप्पणी करण्यात येत असल्याचे तिने नमूद केले आहे. एका आरोपीकडून तिला झिरो फिगर अशा नावाने हिणवले जात होते, तसेच तू काय झिरो फिगर आहेस का असे बोलत तिची साडी खेचून शरीराला स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रजा मेमन नावाचा आरोपी तिला प्लेअर म्हणून संबोधत होता आणि तिच्याशी अयोग्य संवाद साधत होता. गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसून आल्यावर पेंट्रीजवळ तिची साडी खेचल्याचीही गंभीर बाब फिर्यादीत नमूद आहे. दुसऱ्या टीमचा कर्मचारी असूनही आरोपी वारंवार तिच्या जवळ येऊन बसत होता, तिच्याकडे वाईट नजरेने पाहत अश्लील टिप्पणी करत होता. तौसिफ आणि दानिश या दोघांकडून तिच्यावर कामाचा अतिरिक्त ताण टाकून दबाव आणला जात असल्याचेही सांगितले गेले आहे. याशिवाय हिंदू देवी देवतांबद्दल तसेच छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

Nashik Live शिक्षणमंत्री दादा भुसे यांची नाशिकमध्ये आढावा बैठक सुरू

नाशिक महापालिकेत शालेय शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली असून शिक्षणमंत्री दादा भुसे स्वतः उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीत पालकांकडून येणाऱ्या विविध तक्रारींची सविस्तर माहिती ते जाणून घेत आहेत. महापालिकेच्या शाळांची सध्याची अवस्था, सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेबाबतही सखोल चर्चा सुरू आहे. या बैठकीतून शालेय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Kolhapur Live: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाला आज सुरुवात झाली असून जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी, ठेकेदारी पद्धत बंद करावी यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरातील सुमारे सतर लाख कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत असून सरकारने पुढील आठ दिवसांत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Bhiwandi : भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरामध्ये असलेल्या मूलचंद कंपाऊंड येथे असलेल्या ऑईल गोदामाला भीषण आग

या गोदामात मोठ्या प्रमाणात आॅईलचे ड्रम

साठवून ठेवले असल्याची असल्याची माहिती

आगीचं कारण अस्पष्ट

आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक

अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल

आगीमुळे धुराचे लोटच्या लोट आकाशात

supriya sule : सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात; बारामतीमधील सभेला जाणार

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत.

बारामतीत आयोजित केलेल्या सभेला सुप्रिया सुळे जाणार आहेत.

हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन; वैभव नायकवडींच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन; वैभव नायकवडींच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

सांगलीच्या वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्या विरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कारखान्याचे चेअरमन व क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडींची सुपुत्र वैभव नायकवाडी यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे

Mumbai Live : खर्डी स्टेशनजवळ रात्री घेतलेल्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

खर्डी स्टेशनजवळ रात्री आवश्यक तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक पहाटे 3 वाजता संपवून रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार होती. मात्र काम पूर्ण न झाल्याने हा ब्लॉक थेट सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला.

ब्लॉक वाढल्यामुळे लोकल तसेच एक्सप्रेस रेल्वे सेवा ठप्प राहिली. परिणामी सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Live : जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कंत्राटी कामगारांचा बेमुदत संप

जोगेश्वरी पूर्व येथील ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून, पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. 130 हून अधिक कामगार रुग्णालय परिसरात ठिय्या देऊन बसले आहेत.

कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत असून, तब्बल 27 महिन्यांचा भविष्यनिर्वाह निधी (PF) प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनात महिला कामगारांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे.

Live : एमएचटी-सीईटी पीसीबी गटाची पहिली परीक्षा आजपासून; २.८४ लाख विद्यार्थी बसणार

औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षणाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी पीसीबी गटाच्या पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. ही परीक्षा २१ ते २६ एप्रिलदरम्यान राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १८९ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.

Weather Update : मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा कडाका कायम असून काही भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. आज मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण कायम राहणार असून २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Karnataka Transport : 'परिवहन'चा आजपासून संपाचा इशारा; राज्यभरात बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता

बंगळूर : दीर्घकाळ प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या आग्रहासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, आज (ता. २१) पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आज (ता. २१) सकाळी शहरातील फ्रीडम पार्क येथे केएसआरटीसी (ईशान्य, वायव्य) तसेच बीएमटीसीचे कर्मचारी निदर्शने करणार आहेत. त्यामुळे बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Railway Crossing Closed Tomorrow : धुरुंग मळ्यानजीकचे रेल्वे फाटक उद्या बंद राहणार

कोपर्डे हवेली : शिरवडे- कऱ्हाड रेल्वे स्थानकांदरम्यान धुरुंग मळा येथील रेल्वे फाटक क्रमांक ९६ हे बुधवारी (ता. २२) सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत सलग १२ तास बंद राहणार आहे. या कालावधीत फाटकाची गेट व लाइन दुरुस्तीचे महत्त्वाचे काम हाती घेतले जाणार असल्याने कोणत्याही वाहनांना थांबता येणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे कऱ्हाड येथील वरिष्ठ शाखा अभियंता (रेलपथ) कार्यालयाने दिली. याबाबतचे पत्र ग्रामपंचायत शिरवडे, नडशी, कोपर्डे हवेली, तालुका पोलिस, कऱ्हाड आगार व्यवस्थापक, शिरवडे स्टेशन मास्तर, तसेच संबंधितांना पाठवले आहे.

JEE Main Exam Result : राज्यातील सिद्धार्थ, माधव 'जेईई मेन'मध्ये अव्वल; देशातील २६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

पुणे : राष्ट्रीय पातळीवर देशातील नामांकित संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘जेईई मेन’ दुसऱ्या सत्रातील परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) निकाल जाहीर केला असून, यात देशातील २६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले. यात महाराष्ट्रातील सिद्धार्थ आठले, माधव विराडिया यांनी १०० पर्सेंटाईल मिळविले. यातील माधव याने जेईई पहिल्या, दुसऱ्या अशा दोन्ही सत्रात १०० पर्सेंटाईल मिळविल्याचा विक्रम केला.

Government Employees Strike : सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची हाक; शिक्षकांचेही आजपासून काम बंद आंदोलन

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १७ लाख कर्मचारी आजपासून (ता. २१) बेमुदत संपावर जाणार आहेत. संपाच्या निर्णयावर कर्मचारी संघटना ठाम असल्याने राज्यातील शासकीय रुग्णसेवेसह सरकारी कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

Mumbai Water Supply Suspended : मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

मुंबई : मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी येथे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. त्यामुळे बुधवारी (ता. २२) सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी (ता. २३) पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास १८ तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Bus Accident : बस दरीत कोसळून २१ प्रवाशांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात रामनगर-उधमपूर मार्गावर काल सकाळी बस १५० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला, तर ६१ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

CM Devendra Fadnavis : राज्यातील नऊ जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्या; CM देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

Latest Marathi Live Updates 21 April 2026 : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असताना राज्यातील नऊ जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.