Anit Padda Emotional Post For Grandfather Death: बॉलिवूडमधील रायझिंग स्टार अभिनेत्री अनिता पड्डावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'सैयारा' चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्रीने आपल्या आजोबांना गमावले आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना याची माहिती दिली. तसेच आजोबांच्या आठवणीत तिनं एक भावुक पोस्टही लिहिली आहे. तिनं आपल्या आजोबांना 'एकमेव प्रेम' म्हटलं आहे. तिची भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी तसेच चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करुन श्रध्दांजली वाहिली आहे.
अनित पड्डाने शेअर केलेली पोस्ट ह्रदयद्रावक आहे. या पोस्टमध्ये तिनं आपल्या आजोबांसोबतच्या प्रेमळ नात्याबद्दलही सांगितले. यावेळी सेलिब्रिटी तसेच चाहत्यांनी तिला सावरण्यासाठी धीर देण्याचा प्रयत्न केला. अनित पड्डाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आजोबांचा हात धरलेला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम. तुम्ही माझ्यापासून दूर जात होता. परंतु, 'मक्खन'ला विसरले नाहीत. जेव्हा तुम्ही आठवणींना धरुन ठेवू शकत नव्हते, तेव्हा तुम्ही प्रेमाला धरुन ठेवले. मी त्या दोन्ही जपून ठेवेन. मी एक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेन. मी तुमच्या जोक्स लक्षात ठेवेन. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी हे जोक्स लोकांना सांगेन'.
View this post on Instagram
'मी तुमच्या स्टोरी सोबत ठेवेन. त्या संपूर्ण जगाला सांगेन. तुम्ही मला सर्वात शुद्ध, बिनशर्त प्रेम शिकवले. आज मी आकाशातील सर्वात तेजस्वी तारा पाहिला आणि मला कळले की तुम्ही कुठे गेले आहात. दादू, माझे तुमच्यावर प्रेम आहे' , असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनितला तिचे आजोबा, 'मक्खन' किंवा 'हीरापूत' नावाने हाक मारायचे. गेल्या काही काळापासून अनितचे आजोबा अल्जायमर नावाच्या आजाराशी झुंज देत होते. तिनं अनेक मुलाखतीतून या आजाराविषयी माहिती दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..