जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमुळे देशात सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी तो कमी होताना दिसतोय. सध्या सोन्याचा भाव पुन्हा एकदा कमी झाला आहे. त्यामुळे 22, 24 कॅरेट सोन्याचा भाव काय ते जाणून घेऊ या...
20 एप्रिलच्या तुलनेत सोन्याचा भाव 370 रुपयांनी घसरला आहे. थेट आकडे सांगायचे झाले तर 20 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 153,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
आता हाच भाव 153,570 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच 24 कॅरेट सोनं 20 एप्रिलच्या तुलनेत 0.24 टक्क्यांनी पडलं आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 339.20 रुपयांनी पडला आहे.
22 कॅरेट सोन्याचा भाव 141,112 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हीच किंमत आज (21 एप्रिल) 140,773 रुपये प्रति 10 ग्रॅम झााल आहे. इराण युद्ध संपण्याची शक्यता असल्याने सोन्याचा भाव कमी होत असल्याचे बोलले जात आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)