Vastu Shastra : मनी प्लांटसोबतच घरात लावा हे झाड, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही
Tv9 Marathi April 22, 2026 12:45 AM

वास्तुशास्त्र हे प्रामुख्यानं दोन घटकांवर कार्य करतं, एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरा घटक म्हणजे नकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध समस्या येण्यास सुरुवात होते, यातील अनेक समस्या या पैशांची संबंधित असतात. मात्र जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा तुम्हाला याच्या उलट परिणाम दिसून येतो, तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे खुले होतात, अचानक धनलाभ होतो. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगण्यात आली आहेत, जी घरात लावणं अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचा बचाव होतो. असंही एक झाडं आहे, जे झाड जर तुम्ही मनी प्लांटसोबत लावलं तर तुम्हाला त्याचं डबल फळ मिळतं, तुमचा दुप्पट फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात मनी प्लांट सोबतच जर जेड प्लांट लावलं तर त्याचा अत्यंत चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळू शकतो. जेड प्लांट हे मुळचं दक्षिण आफ्रिकेमधील झाडं आहे. मात्र भारतामध्ये तुम्हाला हे सहज कुठेही मिळू शकतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही आर्थिक अडचणी येत असतील, हातात पैसा टिकत नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट सोबत जेड प्लांट देखील लावू शकतात. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.

मनी प्लांट लावताना काय काळजी घ्यावी?

मनी प्लांट कधीही प्लास्टिकच्या बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये लावू नये, त्यासाठी कुंडी असावी. तसेच मनी प्लांटचा वेल कधीही घराच्या ईशान्य दिशेला ठेवू नये, कारण ही दिशा देवाची दिशा असते, त्यामुळे या दिशेला मनी प्लांटचा वेल ठेवल्यास त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. मनी प्लांटचा वेल हा पूर्व दिशेला ठेवावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.