SRH vs DC Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ३१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CSK ला जबरदस्त धक्का! फॉर्ममध्ये असलेला आयुष म्हात्रे IPL 2026 मधून झाला बाहेर, नेमकं काय घडलं?दोन्ही संघात बदल झाले आहेत. हैदराबाद संघात हर्ष दुबेचे पुनरागमन झाले आहे. तसेच इम्पॅक्ट प्लेअरसाठी दिलशान मदुशंका किंवा प्रफुल हिंगे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, तसे संकेत नाणेफेकीवेळी इशान किशनने दिले.
तथापि, हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स संघात दाखल झाला असला, तरी या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे इशान किशनच नेतृत्व करताना दिसेल.
दिल्ली कॅपिटल्सने आकिब नबीच्या जागेवर नितीश राणाला संधी दिली आहे. हा एकच मोठा बदल दिल्लीने केला आहे.
प्लेइंग इलेव्हनसनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, हर्ष दुबे, साकिब हुसेन, इशान मलिंगा
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - स्मरण रविचंद्रन, प्रफुल हिंगे, लियाम लिव्हिंगस्टोन, दिलशान मदुशंका, हर्षल पटेल
दिल्ली कॅपिटल्स - पटुम निसांका, केएल राहुल (यष्टीरक्षक), समीर रिझवी, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, लुंगी एनगिडी
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - करुण नायर, दुष्मंथा चमीरा, आशुतोष शर्मा, त्रिपुराण विजय, अकीब नबी
सनरायझर्स हैदराबादचा हा ७ वा सामना असून ३ सामने जिंकले आहेत आणि ३ पराभूत झाले आहेत. हैदराबादने त्यांचे गेले २ सामने जिंकल्याने ही विजयी लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दिल्लीचा हा ६ वा सामना आहे. त्यांनी ३ सामने जिंकले असून २ सामने पराभूत झालेत. त्यांनीही मागच्या सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे विजयी मार्गावर राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्यायसनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात २६ सामने खेळवण्यात आले असून १२ सामने दिल्लीने जिंकले आहेत, तर १३ सामने हैदराबादने जिंकले आहेत. १ सामना रद्द झाला आहे.