Maharashtra News Live Update: माजी आमदार संदीप नाईक यांना विधान परिषदेवर घ्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी
Saam TV April 22, 2026 02:45 PM
Dharashiv: धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्लिश शिक्षण पद्धती राबवली जाणार

धाराशिव -

धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्लिश शिक्षण पद्धती राबवली जाणार

जिल्हा परिषद शाळांकडून 1068 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे जमा

जिल्हा परिषद शाळा कडून आलेल्या प्रस्तावाची छाननी सुरू, आज सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडले जाणार

Navi Mumbai: माजी आमदार संदीप नाईक यांना विधान परिषदेवर घ्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी

माजी आमदार संदीप नाईक यांना विधान परिषदेवर घ्या भाजप कार्यकर्त्यांची मागणी

विधान परिषदेच्या भाजपच्या वाटेला येणाऱ्या जागेपैकी माजी आमदार संदीप नाईक यांचा पुनर्वसन करा

भाजप कार्यकर्त्यांची मागणी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार आहेत

Amravati: ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड, तिघे ताब्यात

अमरावती -

ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड, तिघे ताब्यात

अमरावती शहर गुन्हे शाखेने ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर मोठी कारवाई करत चालक-मालकासह 3 इसमांना ताब्यात घेतले.

फ्रेजरपुरा हद्दीतील राजुरा येथे महेश पाटकर हा गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यावर मोबाईल अॅपद्वारे सट्टा चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकली.

Kalyan: टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक, अश्विनी पॉलच्या लिव्ह इन पार्टनरला बेड्या

टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटक

अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमीर सय्यदला अटक

काल रात्री पोलिसांनी केली अटक

आमीरला भेटल्यानंतर अश्विनी पॉल ड्रग्सच्या व्यवसायात

एकाच घरात लिव्ह इनमध्ये राहून करत होते ड्रग्सचा व्यवसाय

आमिर हा सराईत ड्रग्स तस्कर, अनेक गुन्हे असून जमिनावर बाहेर

आमीरनेच अश्विनीला दिली होती ही 5 हजार गोळ्यांची MDMA ची पाकिटं

अश्विनीच्या चौकशीतून आमीरचं नाव समोर

Dharashiv: धाराशिवमध्ये अवकाळी पावसात शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठं नुकसान

धाराशिव -

धाराशिवमध्ये अवकाळी पावसात शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठं नुकसान

कष्टाने पिकलेली ज्वारीचं पिक मातीमोल

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने आणि गारपीट झाल्याने ज्वारीचे पीक आडवे तर काढून टाकलेल्या ज्वारीचं देखील मोठं नुकसान

धाराशिव तालुक्यातील तुळजापूर बामणीवाडी आणि केशेगाव,धारुर शिवारात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा

Kolhapur: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

कोल्हापूर -

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजप मधील वाद टोकाला

गोकुळ निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्र पक्षाच्या पॅनल साठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या

मंत्री हसन मुश्रीफ समर्थक गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांची मुश्रीफ यांच्याकडे थेट मागणी

तर भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी कोणी छुपा मित्र आहे का?

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सवाल

गोकुळ वरून कोल्हापुरात महायुतीमध्ये वादाची ठिणगी

Dharashiv: धाराशिवमध्ये वीज पडून 55 वर्षे शेतकऱ्याचा मृत्यू

धाराशिव -

धाराशिवमध्ये वीज पडून 55 वर्षे शेतकऱ्याचा मृत्यू

विठ्ठलवाडी येथे शेतात कडब्याची गंज रचायला गेलेल्या बबन लांडगे या शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू

पुढील आठवड्यात होते बबन लांडगे यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

धाराशिव मध्ये विजांच्या कडकडाट्यासह गारांचा जोरदार पाऊस

Amravati: परतवाडा मुलींचे लैंगिक शोषण अन् व्हिडिओ व्हायरल प्रकरण, आरोपींना सात दिवसाची पोलिस कोठडी

अमरावती -

परतवाडा लैंगिक शोषण व मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरण

बयान अहमदसह चार आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी

27 एप्रिलपर्यंत सर्व आरोपी राहणार पोलीस कोठडीत.

अयान ने रिल बनवण्यासाठी वापरलेली थार गाडी व नोटांचे बंडल, आयफोन रिवाल्वर याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे मत.

मुलींचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून त्यातून आरोपींनी पैसा कमावला का?

आठ आरोपींचे 11 खात्यांचे बँक स्टेटमेंट पोलिसां जवळ,

या बँक खात्यामध्ये आलेल्या पैशाची कसून चौकशी करणे.

आरोपींच्या मोबाईल मधील रिकव्हर झालेला व फॉरेन्सिक लॅब मधून तपासणी करून आलेला डाटा आरोपींच्या समक्ष तपासणे.

Nashik: TCS प्रकरणातील ६ आरोपींचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल

नाशिक -

- TCS प्रकरणातील ६ आरोपींचा जामिनासाठी अर्ज, जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल

- 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी

- यापूर्वी संशयित निदा खान कडून देखील करण्यात आला होता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

- मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यत पुढे ढकलली

- आता अटकेत असलेल्या 6 संशयित आरोपींकडून देखील जामिनीसाठी अर्ज दाखल

- दानिश शेख, आसिफ अन्सारी,तौसिफ अत्तार,शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींकडून जामिनासाठी अर्ज

- 2 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Nashik: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती

नाशिक -

- SIT चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याची माहिती.

- तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स मागवून करण्यात आली भोंदू अशोक खरातच्या प्रकृतीची तपासणी

- खरातला डोकेदुखी , मळमळ व उलटीचा त्रास होत असल्याची माहिती

- छातीत दुखत असल्याने काही काळ लावण्यात आला होता ऑक्सिजन

- दोन दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात यांच्या वकिलांनी न्यायालयात खरातला न्यूरोसर्जन कडे घेऊन जाण्याची केली होती मागणी

Navi Mumbai: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

नेरूळमधील वूडलँड सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावर कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ज्या घरात स्लॅब कोसळला, त्या घरातील सदस्य किचनमध्ये असल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था कुकशेत येथील मार्केटमध्ये करण्यात आली

सुरक्षिततेच्या कारणास्तव ही इमारत सील करण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.