Nashik Crime News: विवाहबाह्य प्रियकर आपल्याबरोबरच राहावा, यासाठी स्वतःच्या पाच वर्षीय मुलाचा प्रियकराने अपहरण केल्याचा बनाव एका महिलेने रचला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा बनाव उघडकीस (Nashik Crime News) आला. या प्रकरणी खोटा बनाव रचल्याने महिलेवर मालेगाव तालुक्यातील वडनेर (Vadner) खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी CCTV फुटेज आणि तपासाची चक्रे फिरवीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. (Malegaon Crime News)
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मालेगावातील पंचशील नगरातील मनीषा मयूर मोंडल (वय 35) या महिलेचा प्रियकर मोहन साईनाथ मोरे (32, रा. अजंग) तिच्याबरोबर राहत नव्हता, तो सोबत राहावा यासाठी तिनेच साडेपाचवर्षीय मुलाला तिच्या नातेवाइकांकडे लपविले आणि मोहनने त्याला पळवून नेल्याचा बनाव रचला. पोलिसांनी मोहनला ताब्यात घेतले, मात्र त्याने मुलगा लपविला नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांचा मनीषावरच संशय बळावला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मनीषा ही तिच्या चिखल ओहोळ येथील तिचा मित्र विष्णू श्रीराम सोनवणे याच्या ताब्यात मुलगा जितेशला देत असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने मुलाला ताब्यात घेत जितेशला आई व वडिलांच्या स्वाधीन केले. या सर्व प्रकरणी मनीषाने खोटा बनाव रचल्याने तिच्यावर वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
Crime News: धावत्या रेल्वेत मारेकऱ्यांना ‘सिनेस्टाईल’ अटक; चोपड्यातील तरुणाच्या खुनाची उकल !
चोपडा शहरातील चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ प्रदीप राजेंद्र महाजन यांचा पूर्व वैमनस्यातून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर विजय भास्कर वैदकर व निर्मल संजय बडगुजर हे आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा मुंबईपर्यंत माग काढला. आरोपी जळगावकडे परत येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाशिक ते चाळीसगावदरम्यान धावत्या रेल्वेत ‘सिनेस्टाईल’ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या