Kunkeshwar temple : कुणकेश्वर (ता.देवगड) परिसरात स्थानिकांच्या आठवणीत असलेल्या आणि काळानुरूप माती तसेच झाडाझुडुपांमध्ये गडप झालेल्या गंगाकुंडाची स्वच्छता करून ते खुले करण्यात आले आहे. कुंडाच्या एकूण बांधणी आणि रचनेवरून ते प्राचीन असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या लगतच एक कोरीव शिवलिंगही असल्याचे दिसून येत असल्याचे स्थानिक सांगतात. श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरापासून जवळच हा भाग आहे.
आपल्याकडे राजापूरगंगा सर्वश्रुत आहे. त्यानंतर अलीकडे तालुक्यातील दहिबांव येथेही गंगा प्रकटस्थान असल्याचे सांगितले जाते. यावरूनच कुणकेश्वर भागातही पूर्वी गंगाकुंड असल्याची आठवण ताजी झाली. यातूनच स्थानिक ग्रामस्थ संतोष लब्दे, संतोष लाड, शरद वाळके यांच्यासह अन्य मंडळींनी याबाबतची शोध मोहीम राबवण्याचा निर्धार करून हालचाली सुरू गेल्या. परिसराची पहाणी करून झाडाझुडपे आणि पालापाचोळासह आवश्यक स्वच्छता करताच मातीमध्ये गडप झालेले गंगाकुंड निदर्शनास आले.
परिसराची पूर्ण स्वच्छता केल्यानंतर त्याच्या एकूणच बांधणीवरून ते कुंड प्राचीन बांधकामातील असावे, असा अंदाज वर्तवला गेला. सुमारे पाच फुट खोल असलेल्या या भागात चौकोनी आकारातील असलेल्या कुंडातील माती आणि गाळ काढण्यात आला. स्वच्छतेनंतर या भागात स्वच्छ पाणी साठलेले आढळले. गंगाकुंडाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून परिसरात कोरलेले एक शिवलिंग असल्याचे दिसून आले आहे.
kokan Rehabilitation : कोयना प्रकल्पग्रस्तांचा संताप उफाळला! न्यायासाठी आता न्यायालयाची दारं ठोठावणारयाची माहिती कोकण इतिहास परिषदेचे रणजित हिर्लेकर यांनी घेतली. त्यांच्या मते हे ठिकाण प्राचीन असून भूगर्भातील पूर्वीच्या जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहे. याबाबत संतोष लब्दे यांनी, आपल्या परिसरात असलेल्या पुरातन गोष्टींची माहिती करून घेत त्याचे जतन करणे आवश्यक असल्याचे नमुद करून यातून पर्यटन वाढीसाठी मदत होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला.