तुमच्याही घरात साप लपलाय का? या 4 गोष्टी दिसल्या तर सावध व्हा, तिथे साप असतोच
Tv9 Marathi April 22, 2026 10:45 PM

सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सापांना मारलं जातं. याचा परिणाम म्हणजे देशासह राज्यातील सापांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु साप हा निसर्ग साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. जर सापांची संख्या कमी झाली तर त्याचे फार गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. ज्या भागांमध्ये सापांची संख्या कमी होते, तिथे उंदीर आणि घुस या सारख्या प्राण्यांची संख्या वाढते. त्यामुळे सापांना न मारता जर समजा तुम्हाला कुठे साप आढळलाच तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. सापांपासून बचावाचा मार्ग म्हणजे सांपापासून सतर्क राहणं. आता उन्हाळा सुरू झाला आहे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरात शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. जर एखाद्या घरात साप लपून बसला असेल तर तो काही विशिष्ट संकेत देतो, तुम्ही जर काळजीपूर्वक त्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला देखील सहज ओळखता येईल की तुमच्या घरात साप आहे की नाही?

कातीन – कातीन हा सापांच्या अंगावरील बाह्य त्वचेचा एक विशिष्ट थर असतो. ठराविक अंतराने साप आपल्या कातीनीला आपल्या मुख्य शरीरापासून वेगळे करतात. जर तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात कुठेही अशी कातीन दिसली तर समजून जा की त्या परिसरामध्ये कुठेतरी साप असू शकतो.

विशिष्ट वास – सापांना विशिष्ट प्रकारचा वास असतो, जो एखाद्या सडलेल्या वस्तूप्रमाणे असतो. जर तुम्हाला तुमच्या घरात असा वास येत असेल तर सावध व्हा, सर्व घर योग्य ती काळजी घेऊ स्वच्छ करा, तुमच्या घरात साप असू शकतो.

उंदीर, पाली – जर तुमच्या घरातील उंदीर किंवा पाली अचानक गायब झाल्या तर समजू जा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये किंवा घरामध्ये साप असू शकतो. कारण उंदीर हे सापाचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे या संकेताकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

जर तुम्हाला तुमच्या बागेत किंवा मुख्य रस्त्यावर एखाद्या सरपटणाऱ्या प्राणाची खूण दिसली तर याचा अर्थ देखील असा होतो की तुमच्या घराच्या आसापस कुठेतरी साप असू शकतो, त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. सतर्कता हाच सापांपासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

बीळ – जर तुमच्या घराच्या परिसरात किंवा घरात बीळ असेल तर अशी बीळं लगेच बुजून टाका. कारण ही बीळ एकतर उंदरांची असू शकतात किंवा सापांची देखील असण्याची शक्यता असते. जर बीळ उंदरांची असतील तर साप शिकारीसाठी अशा बिळात शिरतो, त्यामुळे जर घरात अशी बीळं असतील तर सर्पदंशाचा धोका वाढतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.