मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुसाट करणाऱ्या कोस्टल रोड (सागरी किनारा मार्ग) प्रकल्पाच्या खर्चाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. मरिन ड्राइव्ह येथील एन.एस. रोडला समांतर असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आता अतिरिक्त ६० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या वाढीव खर्चासह प्रकल्पाचा एकूण खर्च आता १४,९७७ कोटींवर पोहोचला असून, तो लवकरच १५ हजार कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचामूळ आराखडा तयार झाला तेव्हा त्याचा खर्च १२,७२१ कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात काम करताना अनेक तांत्रिक आव्हाने समोर आली. ताज्या माहितीनुसार, मरिन ड्राइव्ह येथील समांतर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी ५९ कोटी ८५ लाखांचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. केवळ कोणत्याही प्रकारचे चर्चा न होता तो काही मिनिटातच मंजूर करण्यात आला. कंत्राटदाराला ही रक्कम अदा केल्यानंतर खर्चाची ही सातवी सुधारित फेरी ठरणार आहे.
Mumbai News: पाणीवाटपात दुजाभाव! दक्षिण मुंबईत मुबलक पाणी, उपनगरांत मर्यादित पुरवठाप्रकल्प सुरू झाल्यापासून अनेक कारणांमुळे खर्चात भर पडली आहे. मच्छिमारांच्या मागणीनुसार पुलाच्या दोन खांबांमधील अंतर वाढवण्यासाठी ९२२ कोटींचा अतिरिक्त खर्च झाला.समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी नवीन टेट्रापॉड बसवणे, हाजी अली येथे बहुमजली वाहनतळ उभारणे आणि बोगद्यातील अत्याधुनिक वायुविजन (व्हेंटिलेशन) प्रणालीमध्ये केलेले सुधार यामुळे खर्चात मोठी वाढ झाली.जीएसटी लागू झाल्यामुळे प्रकल्प खर्चात सुरुवातीलाच मोठी वाढ झाली होती.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे अशा १०.५८ किमीच्या या मार्गाचा मोठा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका झाली असली, तरी मूळ अंदाजापेक्षा प्रकल्प खर्च तब्बल २,२५५ कोटींनी वाढला आहे. सातत्याने वाढणाऱ्या या खर्चामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईचे सावट, २४ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कोणत्या भागात? वाचा सविस्तर...