आमचं कुटुंब देशसेवेसाठी सदैव तत्पर, खासदार व्हायला नक्की आवडेल, आमदार श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य, तर अशोक चव्हाण म्हणाले... 
अभिषेक एकबोटे, एबीपी माझा April 23, 2026 01:13 AM

Shrijaya Chavan : राजकीय वारसा लाभलेल्या भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजया चव्हाण नांदेडमध्ये सक्रिय पाहायला मिळत आहेत. पत्रकार परिषदे दरम्यान त्यांना "खासदार व्हायला आवडेल का?" असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर स्मितहास्य करत त्यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. देशाच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच आवडेल. आमचे कुटुंब देशसेवेसाठी सदैव तत्पर आहे, असे श्रीजया चव्हाण यांनी स्पष्ट केले.

तिची जी इच्छा असेल तेच तिने करावे : अशोक चव्हाण

दुसरीकडे, बाजूलाच बसलेले अशोक चव्हाण यांना जेव्हा मुलीच्या या इच्छेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी लोकशाही मार्गाने उत्तर देणे पसंत केले. तिची जी इच्छा असेल तेच तिने करावे, मला त्यात काय करायचे आहे? असे म्हणत त्यांनी श्रीजया यांच्या राजकीय प्रवासाचा निर्णय त्यांच्यावरच सोपवल्याचे दिसून आले. अशोक चव्हाणांनी जरी "पहिली टर्म अजून व्हायची आहे" असं म्हणून विषयाला थोडं बगल देण्याचा प्रयत्न केला असला, तरी श्रीजया चव्हाण यांच्या उत्तराने नांदेडच्या राजकीय वर्तुळात नवा संदेश गेला आहे. चव्हाणांचा वारसा आता संसदेच्या दिशेने कूच करणार का? अशा चर्चा आता  नांदेड मध्ये सुरू झाल्या आहेत.

कोण आहेत श्रीजय चव्हाण?

अ‍ॅड. श्रीजया चव्हाण यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधान सभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षात कडून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकरांचा पराभव केला आहे. या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. नोव्हेंबर 2024 मध्ये निवडून आलेल्या आहे त्या प्रसिद्ध चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेत्या आहेत. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार श्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत यांनी भोकरमधून लक्षणीय फरकाने विजय मिळवून राजकारणात पदार्पण केले आणि चव्हाण कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवीधर असलेल्या त्या भोकरमध्ये विकास, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या तळागाळातील सामाजिक कार्यासाठी आणि युवक आणि शेतकरी कल्याणासाठी वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. आमदार म्हणून यांनी भोकर मध्ये शिक्षण सुधारणे , रोजगारांच्या संधी निर्माण करणे आणि राहणीमान उंचावणे या विषयावर त्यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट केले आहेत .त्या मतदारसंघ विकासात सक्रियपणे सहभागी असून ,पायाभूत सुविधा , पाणीपुरवठा आणि सामाजिक कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित करतात.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.