PSL 2026 fastest hundred by Steve Smith details: पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्टीव्ह स्मिथच्या चौफेर फटकेबाजीचा आनंद पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना लुटता आला. मुलतान सुलतान संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने १२ चौकार व ६ षटकांराचा पाऊस पाडताना १८ चेंडूंत ८४ धावा कुटल्या आणि पीएसएलच्या या पर्वातील वेगवान शतक झळकावले. त्याच्यासोबतीला साहिबजादा फरहान उभा राहिला आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३२ धावा जोडून संघाला २१३ धावांपर्यंत पोहोचवले.
हैदराबाद किंग्सनमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सुलतानच्या फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. स्मिथ आज वेगळ्याच फॉर्मात दिसला. फरहान ४३ चेंडूंत ६६ धावा करून ( ४ चौकार व ५ षटकार) माघारी परतल्यानंतर स्मिथने सूत्र आपल्या हाती घेतली. एका बाजूने विकेट पडत असताना स्मिथ दुसऱ्या बाजूने चांगले फटके खेचताना दिसला. त्याने ५० चेंडूंत १०६ धावांची खेळी केली.
किंग्समनच्या अकिफ जावेदने तीन विकेट्स घेतल्या. २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ फलंदाज ४८ धावांवर माघारी पाठवले गेले. मुहम्मद इम्सेलने या तिन्ही विकेट्स घेतल्या. कर्णधार मार्नस लाबुशेन २२ चेंडूंत ४० धावांवर खेळतोय आणि हे वृत्त लिहिले तेव्हा किंग्समनच्या ८ षटकांत ३ बाद ९ ३ धावा झाल्या होत्या.
स्मिथचे हे पीएसएलमधील पहिलेच षटक ठरले. त्याने या पर्वात ९ सामन्यांत १६३ च्या स्ट्राईक रेटने ३३७ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. आयपीएलमध्येही स्मिथने चार फ्रँचायझकडून खेळताना १०३ सामन्यांत १ शतक व ११ अर्धशतकांसह २४८५ धावा केल्या आहेत. पण, २०२१ पासून तो आयपीएलमध्ये खेळलेला नाही.
स्मिथने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना १२३ कसोटीत ५६.०६ च्या सरासरीने १०७६३ धावा केल्या आहेत. त्यात ३७ शतकं व ४४ अर्धशतकं आहेत. १७० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ५८०० धावा आहेत आणि त्यात १२ शतकं व ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ६७ सामन्यांत १०९४ धावा त्याने केल्या आहेत.