पंचांग -
गुरुवार : वैशाख शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.१३ सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सकाळी ११.३१ चंद्रास्त उ. रात्री १.११, गंगासमाप्ती, गंगोत्पत्ती, गंगापूजन, गुरुपुष्यामृत रा. ८.५७ नं., भारतीय सौर वैशाख ३ शके १९४८.
दिनविशेष -
२००३ - राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर.
२००७ - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहक ‘पीएसएलव्ही-सी ८’ ने सतीश धवन अवकाश केंद्रातून उड्डाण केले आणि २२ मिनिटांतच ३५२ किलोग्रॅम वजनाचा ‘एजिल’ हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत भ्रमण करू लागला.