'धुरंधर 2'च्या केसालाही धक्का लावू शकला नाही अक्षय कुमारचा 'भूत बंगला'; 35 व्या दिवशीही बॉक्स ऑफिस हादरवलं, दिग्गजांना लोळवलं
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 23, 2026 11:13 AM

Dhurandhar 2 Box Office Collection Day 35: रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर आणि आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) म्हणजेच, 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) रिलीज होऊन आता महिन्याभराहून अधिक काळ लोटला आहे. तरीही त्यानं बॉक्स ऑफिसवरचा (Dhurandhar The Revenge Box Office Collection) आपला ताबा काही सोडलेला नाही. खरं तर 'धुरंधर 2' रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत होता, पण पाचव्या आठवड्यात प्रियदर्शन आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा 'भूत बंगला' (Bhooth Bangla) आल्यानंतर 'धुरंधर 2'च्या कमाईत घसरण होईल, असं बोललं जात होतं. मात्र,  'धुरंधर 2'नं आपली धुवांधार कमाई सुरूच ठेवली आणि अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' सिनेमालाही पाणी पाजलं. रिलीजच्या 35 व्या दिवशीही आदित्य धरच्या 'धुरंधर 2'नं धमाकेदार कमाई केली आहे. 

'धुरंधर 2'च्या यशाबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. सिनेमातल्या स्टार कास्टचा अभिनय, स्क्रिप्ट, म्युझिक अशा सर्वच बाबतीत या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच महिनाभरानंतरही तो थिएटरमध्ये ठामपणे उभा आहे. 'भूत बंगला' सिनेमाकडून जोरदार स्पर्धा मिळत असूनही 'धुरंधर 2' अजूनही कोट्यवधींची कमाई करतोय. असं असलं तरीसुद्धा आता मात्र, 'धुरंधर 2'च्या कमाईचा वेग थोडा मंदावला असून आकडे सिंगल डिजिटपर्यंत आले आहेत.

आतापर्यंतची 'धुरंधर 2'ची कमाई किती? (Dhurandhar 2 BO Collection)

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार, पाचव्या बुधवारी म्हणजेच 35व्या दिवशी 'धुरंधर 2'नं भारतात सुमारे 1.70 कोटी रुपयांची नेट कमाई केली. यासह या सिनेमाची देशांतर्गत एकूण कमाई आता 1121.09 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

आकडेवारीनुसार, पाचव्या सोमवारी 'धुरंधर 2'नं 1.62 कोटी, तर मंगळवारी 2.10 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर शुक्रवारी 2.70 कोटींची कमाई झाली, तर शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे 4.65 कोटी आणि 5.20 कोटींची भर पडली.

'धुरंधर 2'चा 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने 674.17 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. दुसऱ्या आठवड्यात 263.65 कोटींचा व्यवसाय झाला, तर तिसऱ्या आठवड्यात 110.60 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 54.70 कोटींची कमाई नोंदवली गेली.

'धुरंधर 2'ची 'पुष्पा 2'वर मात? (Dhurandhar 2 vs Pushpa 2)

'धुरंधर 2'नं सुरुवातीपासूनच अपेक्षेपेक्षा उत्तम प्रदर्शन केलंय. घरगुती बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूड फिल्म आहे. सुरुवातीपासूनच या सिनेमानं अपेक्षेपेक्षा अधिक दमदार कामगिरी करत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. जासूसी अ‍ॅक्शन थ्रिलर असलेला हा सिक्वेल आता 'पुष्पा 2'ला मागे टाकत भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. उल्लेखनीय बाब म्हणजे, 'पुष्पा 2'नं 1265.97 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

रणवीर सिंहच्या या सिनेमाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमाचा किताब मिळवण्यासाठी अजूनही 100 कोटींहून अधिकची भर घालावी लागणार आहे. मात्र सध्या कमाईचा वेग कमी होत असून 'भूत बंगला'कडून मिळणारी कडवी स्पर्धा लक्षात घेता हे लक्ष्य गाठणं कठीण दिसत आहे. तरीही, 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं असून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात त्याची नोंद एक मोठा ब्लॉकबस्टर म्हणून कायम राहणार आहे.

Youth Film Trending On Netflix: 'धुरंधर 2' नाही, 'ही' फिल्म 2026 ची 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही'; 2 तास 20 मिनिटं पापणीही पडू देणार नाही, IMDb रेटिंगही धमाकेदार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.