मुंबई : लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अनेक श्रीमंत टॅक्स भरणाऱ्या हिलांनी योजनेचा गैरफायदा घेतला. शिवाय काही पुरुष मंडळींनी महिला असल्याचे दाखवत योजनेचा गैरफायदा घेतला होता.राज्यात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाडक्या नसलेल्या या 12757 पुरुषांनी सरकारला 22.96 कोटी रुपयांना चंदन लावले होते. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून 50 टक्के वसुली सुद्धा केली. पण, घुसखोर भावांनी बहीण बनून लाटलेले 22.96 कोटींची वसुली कधी करणार हा प्रश्न आहे. या वसुली बाबत महिला व बालकल्याण विभागाकडे कुठलेही नियोजन सध्या दिसत नाही. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
– घुसखोर महिला कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम-1981 नुसार कारवाईचे पत्र 29जुलै 2025 रोजी पाठवले होते. म्हणून तरी निम्मी वसुली झाली.
– पुरुषांची वसुली झाली नाही म्हणून 9 ऑक्टोबर 2025 ला महिला व बालकल्याणचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवांनी ‘ग्रामविकास’ला अहवाल मागवला.
– साडेपाच महिन्यांत बोगस महिलांपैकी निम्म्या महिलांकडूनच वसुली होऊ शकली आहे. पुरुषांची मात्र झाली नाही.
– पुरुषांकडील वसुलीसाठी विभागाने साधे पत्रही काढले नाही. त्यामुळे बोगस पुरुष लाभार्थी सरकारचे ‘लाडके भाऊ’ ठरताहेत. त्यामुळे त्यांना सूट मिळाली की काय, अशीच सर्वत्र चर्चा आहे.
हिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत वाढवत आहोत, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत होती. आता ही मुदत एक महिन्यानं वाढवण्यात आली आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनं मुदतवाढ देण्यात येत असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात येत असल्याचं आदिती तटकरेंनी म्हटलं. महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दरमहा 1500 रुपयांप्रमाणं महिलांना दिला जातो. आता लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
आणखी वाचा