Sangli NH 66H highway update : सांगली-पेठ रस्ता गुळगुळीत झाला; मात्र कसबे डिग्रज ते तुंग दरम्यानच्या ८०० मीटरच्या अंतरामुळे वाहनधारकांना नरकयातना सोसाव्या लागल्या. जिल्हाधिकारी आणि खासदारांनी यात पुढाकार घेतल्याने अखेर उर्वरित रस्ते कामाला आज (ता. २२) सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
नागपूर-रत्नागिरी आणि पुणे-बंगळूर या महामार्गांना जोडण्यासाठी ‘एनएच-६६ एच’ हा सांगली-पेठ हा चारपदरी रस्ता केला आहे. याच रस्त्यावर १६ पदरी रस्ता करून टोलनाका उभारण्यात येणार होता. शेतकऱ्यांनी टोलनाक्याला जागा देण्यास नकार दिल्याने काम रखडले.
Mumbai Goa Highway toll naka: मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुली होणार! केंद्र सरकारकडून टेंडर काढून ठेकेदार निश्चितीची तयारीजिल्हाधिकारीमैनाक घोष, खासदार विशाल पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महामार्ग प्राधिकरण यांच्यात बैठक झाली. बैठकीत तोडगा निघाल्याने आज कामाला सुरुवात झाली आहे.
असे असतील थर
मुरुम - ५०० एमएम (त्यापुढे गरजेनुसार)
जीएसबी (ग्रॅन्युलर सब-बेस) १५० एमएम
डीएलसी (ड्राय-लीन-काँक्रिट) - १५० एमएम
काँक्रिट - ३०० एमएम