डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दलचे शब्द ऐकताच तळपायाची आग मस्तकाला जाईल, भारत हा नरकाराचा दरवाजा थेट..
GH News April 23, 2026 05:16 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध सुरू करून जगाला संकटात टाकले. या युद्धाचा फटका अमेरिकेतही बसत आहे. महागाई प्रचंड वाढली. डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील याचा अजिबात नेम नाही. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र असल्याचे सांगताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या पाकिस्तानला हाताशी धरल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडे भारताला जुना मित्र म्हणायचे तर दुसरीकडे भारताविरोधा आग ओकायची ही स्थिती डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि चीन यांच्याबद्दलची एकदम खालच्या स्तरावरील सोशल मिडिया पोस्ट रिपोस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट रिपोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली. भारताबद्दल या पोस्टमध्ये आपत्तीजनक शब्द वापरण्यात आली.

रेडिओ होस्ट मायकल सेवेज याने ही पोस्ट शेअर केली, जी डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोस्ट केली. हेच नाही तर भारताला या पोस्टमध्ये नरकाचा दरवाजा म्हणण्यात आले. सेवेज याने या पोस्टमध्ये दावा केला की, आशियाई देशातील नागरिक अमेरिकेत येतात आणि 9 महिन्यात बाळाला जन्म घालतात. यापद्धतीने ते 9 महिन्याचे बाळ थेट अमेरिकन नागरिक होते. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलला जात आहे ज्यामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे.

ते बाळ तात्काळ अमेरिकन नागरिक बनते. मग त्याचे कुटुंब भारत किंवा चीनमधून अमेरिकेत येते. हे देश जगाचे नरकाचा दरवाजा आहेत. हीच पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रिपोस्ट करण्यात आली. हेच नाही तर यादरम्यान सेवेज याने लॅपटॉप गॅंगस्टर अशा शब्दांचाही यावेळी वापर केला. अमेरिकेच्या ध्वजाच्या या लोकांनी अपमान केल्याचाही आरोप करण्यात आला.

आशियातून अमेरिकेत दाखल झालेले कुटुंब अमेरिकेचे नुकसान करत आहेत. विशेष म्हणजे मूळ अमेरिकी नागरिकांचेही. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात भारताबद्दल किती काळे आहे, हे या पोस्टच्या माध्यमातून पुढे येते. मुळात म्हणजे गेल्या काही वर्षांत भारत ज्यापद्धतीने प्रगती करत आहे, तेच त्यांच्या डोळ्यात झोंबत असल्याचे यावरून दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.