Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य
esakal April 23, 2026 06:45 PM

पुणे : डेक्कन परिसरात तरुणाचा गळा चिरून केलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले (Pune Deccan case investigation) आहे. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्याच्या मदतीने केलेल्या तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला.

पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भिडे पुलाजवळील लकडी पुलाच्या नदीपात्रातील मोकळ्या जागेत एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ashok Kharat SIT Probe : नाशिकच्या भोंदू बाबाला गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे डॉक्टर रडारवर; सोनोग्राफी सेंटर्स-डॉक्टरांचे लागेबांधे? SIT तपासात धक्कादायक खुलासे

तपासादरम्यान मृत तरुणाच्या हातावरील टॅटूच्या आधारे त्याची ओळख कुशल अरुण कसबे (वय ४२, रा. धनकवडी, पुणे) अशी पटली. पुढील तपासात तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून पोलिसांनी संशयितांचा माग काढला असता ओंकार गणेश कांबळे (वय २७, रा. दत्तवाडी) आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झाला.

तपासादरम्यान, आरोपींनी २२ एप्रिल रोजी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हडपसर येथील ब्लिटस सोसायटी परिसरात आढळून आली. तसेच दुचाकीच्या डिक्कीत आरोपींचे मोबाईल सापडले असून ते जप्त करण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

Nashik Crime : नाशिक भोंदूबाबांचा अड्डा! दैवी शक्तीच्या नावावर 28 वर्षीय महिलेवर अत्याचार, 2 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये लॉजवर नेलेलं

कसबे याने आरोपी कांबळे याच्याकडून ७० हजार रुपये घेतले होते. आर्थिक वादातून त्याने कसबेचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात आली आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत असून, खुनाचे निश्चित कारण समजेल’, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिली.

ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ एकचे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, गणेश जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले तसेच युनिट एकचे पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या पथकाने केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.