महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालमृत्यू कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि शाळेबाहेर असलेल्या मुलींची संख्या शून्यावर आणणे या उद्देशाने "लेक लडकी योजना" सुरू करण्यात आली आहे.
ALSO READ: त्र्यंबकेश्वर मंदिर घोटाळा: एसआयटीकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस, आरोपींची कोठडी वाढवली
तसेच महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री योजना लागू करण्यात आली. तर राज्यात १ अप्रैल २०२३ पासून लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांमध्ये मुलींच्या जन्मा नंतर त्यांचे आरोग्य चांगले राहावे व पोषणमध्ये सुधारना तसेच शिक्षणासाठी योग्य पुरेसे अनुदान देऊन मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यावर तिला साधारपणे ७५००० रुपये दिले जातील. या योजनेच्या माध्यमातून अशी अशी तरतूद करण्यात आली असून महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील स्थायी आणि अप्रैल २०२३ नंतर जन्मास आलेल्या मूली पात्र असतील.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुलीचा जन्म झाल्यानंतर पालक अर्ज नक्कीच करू शकतात. आता अनेकांना प्रश्न पडतो कि कसा अर्ज करावा आणि कुठे करावा तर हा अर्ज तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्रातून ऑफलाइन माध्यमाने सादर करता येतो. आता या योजनेच्या लाभार्थी मुलींना १८ वर्ष वय पूर्ण होइसपर्यंत १०१००० मिळते.
तसेच पात्र कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर तात्काळ ₹५,००० मिळतात. त्यानंतर, पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतल्यावर ₹६,०००, सहाव्या इयत्तेत प्रवेश घेतल्यावर ₹७,०००, अकराव्या इयत्तेत प्रवेश घेतल्यावर ₹८,००० आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ₹७५,००० दिले जातात. अशी एकूण ₹१,०१,००० ची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळतो.
एक मुलगा आणि एक मुलगी असली तरी, मुलीला योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या गर्भावस्थेत जुळ्या मुली झाल्यास, दोघींनाही लाभ मिळेल, परंतु त्यानंतर कुटुंब नियोजन करणे अनिवार्य असेल.
लेक लाडकी योजना कागदपत्रे जाणून घ्या
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्र असणे आवश्यक राहील
जन्म प्रमाणपत्र
कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र
लाभार्थी आणि पालकांचे आधार कार्ड
बँक पासबुक
रेशन कार्ड (पिवळे/केशरी)
शाळेचे प्रमाणपत्र
कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
स्व-घोषणा प्रमाणपत्र
अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान कार्ड
मुलीचे चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
लेक लाडकी योजना पात्रता जाणून घ्या
महाराष्ट्र राज्याचे निवासी
१ अप्रैल २०२३ मधील आणि त्यानंतर जन्मलेल्या मूली पात्र
पिवळ्या अणि केशरी रंगाचे शिधापत्रिका असलेले कुटुंबच या योजनेचा लाभ घेऊ शकतात
एका कुटुंबामध्ये दोन मुलींना लाभ
एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ होणार
महाराष्ट्र राज्यातील बैंक खाते आवश्यक
तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेची नोंदणी तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्रात निशुल्क केली जाते. यासाठी शुल्क द्यायची गरज नाही.
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोय नाही तसेच अजून सरकारद्वारे ऑनलाइन पद्धत सुरु झालेली नाही, तर या योजनेचा अर्ज फक्त अंगणवाडी मधून भरू शकतात.
ALSO READ: २००६ मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने ४ जणांना दोषमुक्त केले
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: लाडक्या बहिणींनो घाई करा! ३० एप्रिलपर्यंत e-KYC अपडेट न केल्यास 'लाडकी बहीण' योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता रखडणार