- ratchl२३२.jpg-
26O39204
चिपळूण ः महिला आरक्षणाविषयी संवाद साधताना आमदार भास्कर जाधव.
-----
केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा विरोध ः आमदार जाधव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः केंद्र सरकारला नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या आडून देशात राजकीय अजेंडा राबवायचा आहे. देशातील मोठ्या राज्यात खासदारांची संख्या वाढवून पुन्हा सत्ता मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या विधेयकाच्या आडून सत्ताधारी मोठा डाव आखत आहे. विरोधकांनी संसदेत ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. विरोधकांचा महिला आरक्षणास विरोध नसून, तो केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीला विरोध असल्याचे मत आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
महिला आरक्षणासंदर्भात पत्रकार तसेच विविध राजकीय पदाधिकारी व समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमदार जाधव म्हणाले, केंद्र सरकारने १६ ते १८ एप्रिल दरम्यान ३ कायदे संमत करण्यासाठी विशेष अधिवेशन घेतले; मात्र विरोधात २४८ खासदारांनी मतदान केल्याने तिन्ही विधेयके फेटाळण्यात आली. नारीशक्ती वंदन विधेयक हे मुळात महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नाही. केंद्र सरकारला यातून राजकीय अजेंडा राबवायचा होता. सप्टेंबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या ५ दिवसीय अधिवेशनात महिला आरक्षण विरोधकांनी मतदान केले होते.
चौकट
मी चर्चेला तयार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महिला विधेयकावरील चर्चेचे आव्हान मी स्वीकारले आहे. त्यांनी मला केव्हाही चर्चेला बोलवावे, असे आमदार जाधव यांनी ठणकावून सांगितले.