मुंबई : 24 एप्रिल रोजी देशातील सोने-चांदीच्या किमतींमध्ये घसरण (Gold-Silver Price Today) दिसून आली आहे. आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 1200 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या किमतीतही किंचित घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Gold-Silver Price Today)
भारतात दागिन्यांसाठी सोने ही नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. याशिवाय अनेक गुंतवणूकदार सोने नाणी, बार आणि गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर मानतात. धनतेरस, अक्षय तृतीया आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच लग्नसराईच्या खरेदीतही सोन्याला विशेष महत्त्व आहे. आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोने महागाईविरुद्ध संरक्षण (हेज) म्हणून काम करत असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते सुरक्षित पर्याय मानले जाते.(Gold-Silver Price Today)
दिल्ली
24 कॅरेट – 1,53,700 रुपये
22 कॅरेट – 1,40,900 रुपये
मुंबई
24 कॅरेट – 1,53,550 रुपये
22 कॅरेट – 1,40,750 रुपये
कोलकाता
24 कॅरेट – 1,53,550 रुपये
22 कॅरेट – 1,40,750 रुपये
चेन्नई
24 कॅरेट – 1,55,010 रुपये
22 कॅरेट – 1,42,090 रुपये
बेंगलुरू
24 कॅरेट – 1,53,550 रुपये
22 कॅरेट – 1,40,750 रुपये
हैदराबाद
24 कॅरेट – 1,53,550 रुपये
22 कॅरेट – 1,40,750 रुपये
अहमदाबाद
24 कॅरेट – 1,53,600 रुपये
22 कॅरेट – 1,40,800 रुपये
पटना
24 कॅरेट – 1,53,600 रुपये
22 कॅरेट – 1,40,800 रुपये
लखनऊ
24 कॅरेट – 1,53,700 रुपये
22 कॅरेट – 1,40,900 रुपये
आज देशात चांदीच्या किमतीत प्रति किलो सुमारे 100 रुपयांची घट झाली आहे. सध्या चांदीचा दर 2,59,900 रुपये प्रति किलो आहे. प्रति ग्रॅम चांदीची किंमत 259.90 रुपये आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा सरासरी दर 2,59,900 रुपये प्रति किलो असून चेन्नईमध्ये तो 2,69,900 रुपये प्रति किलो आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि स्थानिक मागणी यावर सोने-चांदीच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदी करताना दरातील बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14 अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.
पैशांची गुंतवणूक करायची असलेल तर अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सोने जेवढे शुद्ध असेल भविष्यात तुम्हाला तेवढेच जास्त पैसे मिळतील. याच कारणामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातही 24 कॅरेट सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांच्या गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे. पैशांच्या गुंतवणुकीसाठी 22 कॅरेट सोने हा पर्यायदेखील चांगला आहे.
सोन्याचे आभूषणं करायची असतील तर ते 24 कॅरेट सोन्यापासून तयार करता येत नाहीत. कारण 24 कॅरेट सोने हे फार नरम असते. ते लगेच तुटते. त्यामुळेच 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्यापासून आभूषणं तयार करता येऊ शकतात. अशा सोन्यात तांबे, चांदी अशा प्रकारचे धातू मिसळले जातात.