होजिअरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Lux Industries Ltd . सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी कंपनीने जाहीर केले की, त्यांच्या बोर्डाने व्यवसायाचे तीन स्वतंत्र वर्टिकलमध्ये विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. तोडी कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या 'फॅमिली सेटलमेंट'मुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
अशी असेल व्यवसायाची वाटणी:कंपनीच्या पोर्टफोलिओमधील ब्रँड्स तीन भागात विभागले जातील, ज्यापैकी दोन नवीन कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध केल्या जातील.
१. व्हर्टिकल A (नवीन कंपनी):
- नेतृत्व: अशोक कुमार तोडी आणि कुटुंब.
- ब्रँड्स: लक्स कोझी (Lux Cozi), लक्स पार्कर, ONN आणि लक्स कॉट्सवूल.
२. व्हर्टिकल B (मूळ लक्स इंडस्ट्रीजमध्येच राहणार):
- नेतृत्व: प्रदीप कुमार तोडी आणि कुटुंब.
- ब्रँड्स: लक्स व्हीनस (Lux Venus), लक्स नायट्रो, लक्स इन्फर्नो आणि लायरा (Lyra).
३. व्हर्टिकल C (नवीन कंपनी):
- नेतृत्व: नवीन कुमार तोडी आणि कुटुंब.
- ब्रँड्स: लक्स क्लासिक, GenX, लक्स करिश्मा, लक्स अमोरे आणि लक्स चॅम्पियन.
सध्या प्रवर्तकांची भागिदारी बौद्धिक संपदा आणि ब्रँड अधिकार:विभाजन झाले तरी मुख्य 'LUX' ट्रेडमार्क हा 'विश्वनाथ होजिअरी मिल्स'च्या (BHML) मालकीचा राहील. मात्र, या तिन्ही कंपन्यांना हा ब्रँड वापरण्यासाठी कायमस्वरूपी परवाना (Perpetual License) देण्यात आला आहे. यामुळे ब्रँडच्या ओळखीला कोणताही धोका पोहोचणार नाही.
शेअर्सची बाजारातील स्थितीलक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत आज १७३८ रुपयांवर ट्रेड करीत असून ही वर्षभराची सर्वोच्च किंमत आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात ८७ टक्के आणि गेल्या ३ महिन्यात ९४ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचे बाजार भांडवल ५२२८ कोटी इतके आहे.
मुकूल अग्रवाल यांचीही मोठी भागिदारीबाजारातील अनुभवी दिग्गज गुंतवणूकदार मुकूल अग्रवाल यांचीही या कंपनीमध्ये आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लक्स कंपनीने ४४२१०० शेअर्स असून जी १.५ टक्क्यांची भागिदारी दर्शवते.
रिटेल गुंतवणुकदारांसाठी काय महत्वाचेगुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी असू शकते. डिमर्जरनंतर, शेअरहोल्डर्सना मूळ कंपनीच्या शेअर्ससोबतच इतर दोन नवीन कंपन्यांचे शेअर्स मिळण्याची शक्यता आहे (प्रमाण ठरल्यानंतर). व्यवसायाचे विभाजन झाल्यामुळे प्रत्येक विभागाला स्वतःच्या स्ट्रॅटेजीनुसार काम करता येईल, ज्यामुळे भविष्यात व्हॅल्यू अनलॉकिंग होऊ शकते. मात्र, शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याने आणि तो ASM कक्षेत असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करणे आवश्यक आहे.