चाबहार बंदरावर भारताचा धमाका, थेट ठेवला प्रस्तावच, भारताचा पूर्ण हिस्साच..
GH News April 24, 2026 04:13 PM

इराणचे चाबहार बंदर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारताने इराणच्या चाबहार बंदराचा विकास केला. मोठा निधी या बंदरासाठी भारताने दिला होता. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत या बंदराबद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, भारत आपली हिस्सेदारी इराणी कंपनीला विकण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनंतर 26 एप्रिल रोजी सूट संपणार आहे. चर्चा अशीही आहे की, भारत चाबहार बंदराबद्दल विचार करत आहे. यावेळीच्या अर्थसंकल्पात भारताने चाबहार बंदराबाबत कोणत्याही निधिची घोषणा केली नाही. ज्यानंतर इराणने आम्हाला भारताचा हा निर्णय धक्कादायक वाटल्याची प्रतिक्रिया दिली. भारतासाठी चाबहार बंदर महत्वाचे नक्कीच आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये चाबदार बंदरावर संकट आहे. अमेरिकेने युद्धात काही दिवसांपूर्वीच आपला मोर्चा चाबहार बंदराकडे वळवला होता.

भारताच्या महत्वपूर्ण आणि रणनितीसाठी चाबहार बंदर अत्यंत महत्वाचे आहे. कारण हे अफगाणिस्तान आणि मध्य आशिया यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. बिझनेस स्टॅडर्डच्या रिपोर्टच्या माहितीनुसार, भारत चाबहार बंदरावरील आपली हिस्सेदारी इराणी कंपनीला विकण्याच्या तयारीत आहे. याकरिता एक प्रपोजलही तयार करण्यात आले.

ज्यात IGPL यांनी इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिडेट आता इंडिया पोर्ट्स ग्लोबल चाबहार फ्री जोन हिस्सेदारी इराणी कंपनीला विकणार आहे. मात्र, ही इराणी कंपनी नक्की कोणती, याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र, सरकावर अजून याबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. IPGL ही कंपनी चाबहार बंदरमध्ये भारताची मदतीने बनलेले टर्मिनल चालवते.

भारताने चाबहार बंदरासाठी मोठा पैसा खर्च केला. अफगाणिस्तान आणि मध्य आशियासाठी हा मोठा शॉर्टकट भारतासाठी आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीनमध्ये चाबहार बंदरावर स्थिती वेगळी आहे. भारताची चाबदार बंदर विकसित करण्याची मोठी रणनीती आहे. पाकिस्तानला धक्का देत भारताने चाबदार बंदर विकसित केले होते. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात थेटपणे फटका बसताना दिसला आहे. त्यामध्ये भारताकडून आपली हिस्सेदारी विकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे कळत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.